----------------------
हेडलाईन्स
----------------
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा वेग मंदावला, कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक धीम्या गतीने, किवळे परिसरात धुक्याचं साम्राज्य
----------------
जम्मू-काश्मीर: अखनूरमधील GREF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद
----------------
जम्मूमधील अखनूरमध्ये जीआरईएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती
----------------
1. 13 तारखेपर्यंत पेट्रोलपंप चालक डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारणार, सेवा शुल्क आकारण्यास तूर्तास बँकांची स्थगिती
----------------
2. मुंबईतील 31 जानेवारीच्या मराठा मोर्चावर दोन विरोधी सूर, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राच्या गटामध्ये तारखेवरुन मतभेद
----------------
3. बोर्डाच्या परीक्षांमुळे महापालिकांची रणधुमाळी फेब्रवारीमध्येच, तर अर्थसंकल्पही 1 फेब्रुवारीलाच सादर होणार
----------------
4. चौथ्या टप्प्यातील 11 नगरपालिकांचे आज निकाल, नागपुरात गडकरींची प्रतिष्ठा पणाला, तर काटोलमध्ये मतदानाला मारहाणीचं गालबोट
----------------
5. राज्यभरात 11 जानेवारीपासून दूध 2 रुपयांनी महाग, शेतकऱ्यांच्या विक्रीत 3 रुपयांनी वाढ, कात्रज, चितळे, कृष्णासह इतर दुधाचा समावेश
----------------
6. हाडं गोठवणाऱ्या थंडीने इटलीचा धबधबाही गोठला, उणे 5 अंश सेल्सियस तापमान
----------------
एबीपी माझा वेब टीम