सरकारच्या हस्तक्षेपानंतर अधिकचा सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय बँकांनी मागे घेतल्याची माहिती मिळते आहे.
एचडीएफएसी आणि अॅक्सिस बँकेने अधिकच शुल्क आकारल्यानं ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन आक्रमक पवित्रा घेत, डेबिट, क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला होता.
डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या इंधनावर 0.25 टक्के पासून 1 टक्क्यापर्यंत चार्ज आकारलं जाणार होतं. त्यामुळे कुठल्याही बँकेच्या केड्रिट आणि डेबिट कार्डद्वारे पेट्रोल देणार नाही, अशी भूमिका पेट्रोल असोसिएशननं घेतली होती. अधिकच्या शुल्कामुळे डिलर्सच नुकसान होत असल्याचं फामपेडाचंही म्हणणं आहे.