Ishan Kishan Innings Highlights भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्यानं निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे. 


इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण 32 चेंडूंमध्ये 56 धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली. 


IND vs ENG, T20 LIVE: भारताला विजयी सूर गवसणार का, पाहा टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर 


दुसऱ्या विकेटसाठी त्यानं संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत 94 धावांची भागीदारी केली.