IND vs ENG, T20 LIVE: भारताला विजयी सूर गवसला, पाहा टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
पहिल्या टी20 समान्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाकडून पराभव स्वीकारल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची रणनीती काय असेल याकडेच साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
विराट कोहलीच्या दमदार खेळीनं आणि अखेरच्या षटकारानं भारतीय संघाच्या खात्यात एका विजयाची नोंद. मालिका 1-1 नं बरोबरीत. सात गडी राखून भारतानं जिंकला सामना
संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीच्या बळावर आता भारतीय संघ विजयापासून अवघ्या काही धावाच दूर आहे.
भारतीय संघात दणक्यात पदार्पण करणाऱ्या इशान किशन यानं प्रभावी खेळी खेळत आदिल रशिदच्या चेंडूवर विकेट दिली. संघाची धावसंख्या 94 वर असताना किशन बाद
भारतीय संघाचा पहिला गडी बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि इशान किशन या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या सावरली आहे. सध्याच्या भारतीय संघाची धावसंख्या 1 गडी बाद 44 धावा.
भारतीय संघाचा पहिला गडी बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि इशान किशन या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या सावरली आहे. सध्याच्या भारतीय संघाची धावसंख्या 1 गडी बाद 44 धावा.
सॅम करनच्या चेंडूवर राहुल बाद. पुन्हा एकदा शून्यावर बाद झाल्यामुळं के. एल. राहुलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे
20 षटकांमध्ये इंग्लंडच्या संघाने 164 धावा केल्या. 6 गडी गमावत पाहुण्या संघाने यजमानांपुढे 165 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
160 धावांवर इंग्लंडचा संघ पोहोचलेला असतानाच सहावा गडी बाद. बेन स्टोक्स झेलबाद
मॉर्गनला भारताच्या शार्दूल ठाकूरनं माघारी धाडल्यामुळं इंग्लंडच्या संघावर काहीसा दबाव पाहायला मिळत आहे. आतापर्यंत विरोधी संघाचे 5 खेळाडू बाद
4 गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडची धावसंख्या 136वर पोहोचली आहे. भारतीय गोलंदाजांना सूर गवसला असून, आता आव्हान आहे ते म्हणजे इंग्लंडच्या फलंदाजीचा वेग रोखण्याचं.
इंग्लंडचा आणखी एक खेळाडू माघारी गेला आहे. त्यामुळं संघाची धावसंख्या 3 गडी बाद 92 धावांवर पोहोचली आहे. सलग दुसऱ्यांदा अर्धशतकाच्या नजीक पोहोचलेल्या जेसन ऱॉय याला यावेळीही अपयशच मिळालं.
युझवेंद्र चहलच्या चेंडूवर डेविड मलान एलबीडब्ल्यू. संघात 24 धावांचं योगदान देऊन मलान माघारी .
पहिल्या चार षटकांमध्ये इंग्लंडनं एक गडी गमावला असून, या संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली आहे.
भारताला पहिल्याच षटकात यश मिळालं आहे. भुवनेश्वर कुमार यानं जोस बटलर या इंग्लंडच्या सलामीवीराला माघारी धाडत सुरुवातीलाच तगडं आव्हान दिलं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना सुरु होण्यापूर्वीचे काही क्षण
या सामन्याच्या निमित्तानं सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान मिळाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये हे दोघंही कोण्याच्या स्थानी खेळतील हे पाहणं औत्सुक्याचं.
नाणेफेक जिंकत भारतीय संघानं प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवन आणि अक्षर पटेल हे आजच्या सामन्यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळं आज भारतीय संघाची धुरा चार गोलंदाजांवर असणार आहे.
पार्श्वभूमी
IND vs ENG, T20 LIVE: भारताला विजयी सूर गवसणार का हेच दुसऱ्या टी20 सामन्यात अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात पाहुण्या संघानं यजमानांना पराभूत केलं. ज्यामुळं आता विराट कोहली नेमका कोणत्या रणनीतीसह दुसऱ्या सामन्यासाठी संघ मैदानात उतरवतो यावर क्रीडा रसिकांचं लक्ष असेल.
टी20 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड एकमेकांविरोधात 15 सामने खेळले आहेत. यातील आठ सामन्यात इंग्लंडनं बाजी मारली आहे तर भारतानं सात सामने जिंकले आहेत. भारतीय भूमिवर इंग्लंडनं सात सामने खेळले आहेत, त्यातील चार सामने जिंकले आहेत. एकमेकांसमोर उभे ठाकलेले हे दोन्ही संघ आणि त्यांच्यातील लढत पाहता या टी 20 मालिकेला येत्या काळात कोणतं वळण मिळणार याकडे क्रीडा जगताचं लक्ष असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -