Irfan Pathan : गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा भाग होऊ शकतो, अशी चर्चा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये होत आहे. हा निर्णय झाल्यास सर्वात मोठी डील असणार आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा गुजरातकडे जाणार? अशीही चर्चा रंगली होती. तथापि ही चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 






इरफान पठाणचा निशाणा कोणावर?


या सर्व घडामोडी होत असतानाच आता इरफान पठाणने केलेल्या ट्विटने आणि त्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांनी भूवया उंचावल्या आहेत. इरफान पठाणने ट्विट करत वापरा आणि फेकून द्या हे सुरुवातीपासूनचं खरं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे हा निशाणा नेमका कोणासाठी अशी चर्चा रंगली आहे. इरफानच्या ट्विटवर सर्वाधिक हार्दिक पांड्याची चर्चा होत आहे. इरफाननं हार्दिक गुजरात सोडणार असल्याने हे ट्विट केलं की अन्य कशासाठी याचाही कयास बांधला जात आहे. दुसरीकडे, जर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग असेल तर गुजरात टायटन्सचा कर्णधार कोण असेल? मात्र, गुजरात टायटन्स व्यवस्थापन भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिल किंवा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्याकडे संघाची कमान सोपवू शकते, असे मानले जात आहे.






गुजरात टायटन्स या खेळाडूंवर डाव लावू शकतो का?


गुजरात टायटन्सच्या नवीन कर्णधाराच्या शर्यतीत शुभमन गिल आघाडीवर आहे. याशिवाय केन विल्यमसनच्या नावाचीही चर्चा आहे. पण गुजरात टायटन्स व्यवस्थापन केन विल्यमसनपेक्षा शुभमन गिलला प्राधान्य देऊ शकते, असे मानले जात आहे. तसेच कर्णधारपदाच्या शर्यतीत राशिद खानच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. खरं तर, गेल्या मोसमात रशीद खानने गुजरात टायटन्सचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध केले होते जेव्हा हार्दिक पांड्या जखमी झाला होता.






गुजरात टायटन्स व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की शुबमन गिलचा स्वभाव शांत आहे, याशिवाय शुभमन गिलमध्ये एक चांगला कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत. त्यामुळे शुभमन गिल कर्णधार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार हे निश्चित मानले जात आहे. आयपीएलशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 15 कोटी रुपयांच्या रोख रकमेवर चर्चा झाली आहे. अशाप्रकारे हार्दिक पांड्याच्या बदल्यात गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूला आपल्या संघाचा भाग बनवणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या