Samsung Galaxy A05 Launched in India : तुम्हाला जर नवीन आणि बजेट फ्रेंडली स्मार्टफोन (Smartphone) हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सॅमसंग (Samsung) निर्माता कंपनी आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी A05 (Samsung Galaxy A05) हा नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन लॉंच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek प्रोसेसर आणि HD Plus पॅनेलसह पॉवरफुल बॅटरी आहे. Samsung Galaxy A05 च्या एक महिना आधी कंपनीने Samsung Galaxy A05s लॉन्च केला होता. दोन्ही मॉडेल्सची डिझाईन आणि वैशिष्ट्य जवळपास सारखीच आहे. या नवीन लॉंच झालेल्या या स्मार्टफोनचे फिचर्स मात्र नवीन आहेत. Galaxy A05 ची किंमत आणि या हँडसेटमध्ये कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, या स्मार्टफोनची किंमत, कॅमेरा वैशिष्ट्य नेमके कसे आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


Samsung Galaxy A05 ची वैशिष्ट्ये कोणती? (Samsung Galaxy A05 Specification)


या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे जो 1600 X 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये MediaTek G85 चिपसेट वापरण्यात आला आहे. Android 13 वर आधारित One UI 5.1 कोर ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या या स्मार्टफोनमधील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकतो. 


Samsung Galaxy A05 कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये कोणती? (Samsung Galaxy A05 Camera)


कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 2-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा आणि समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी 25 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय, 4जी, जीपीएस, ब्लूटूथ व्हर्जन 5.3, यूएसबी टाईप-सी पोर्ट चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी उपलब्ध आहे.


Samsung Galaxy A05 ची भारतातील किंमत किती? (Samsung Galaxy A05 Price)


या नवीन सॅमसंग स्मार्टफोनच्या 4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. तर, 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन ब्लॅक, लाईट ग्रीन आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध असेल.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Cyber Crime Complaint : सायबर भामट्यांकडून फसवणूक, घरबसल्या कशी कराल तक्रार; संपूर्ण स्टेप्स एका क्लिकवर...