मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून खेळणाऱ्या लोकेश राहुलने आयपीएल 11 मध्ये धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं. राहुलने आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या युसूफ पठाणचा विक्रम मोडला.


यानंतर युसूफचा धाकटा भाऊ इरफान पठाणने त्याला एक चॅलेंज दिलं असून त्याने ते स्वीकारलं. युसूफने 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

इरफानने ट्विटरवर लोकेश राहुलचं कौतुक करताना लिहिलं की, “राहुल, जबरदस्त खेळी. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक. यूसुफ भाई, आता 13 चेंडूत प्रयत्न करणार?”


यावर युसूफने अतिशय प्रेमाने उत्तर दिलं. “इंशाअल्लाह, तुझ्यासाठी 13 चेंडूतही अर्धशतक करण्याचा प्रयत्न करेन. केएल राहुलने शानदार फलंदाजी केली. सोबतच तुला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकून फार छान वाटतं. नवी भूमिका तू एन्जॉय करत असशील, अशी आशा आहे.”