नवी दिल्ली : एकीकडे अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचं स्वागत होत असतानाच टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू इरफान पठाणकडेही खुशखबर आहे. इरफान आणि त्याची पत्नी सफा बेग यांनी एका मुलाला जन्म दिला आहे.


पठाणने ट्विटरवर ही गोड बातमी चाहत्यांनी शेअर केली आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये 21 वर्षीय मॉडेल सफा बेगशी त्याचं लग्न झालं होतं. सौदी अरेबियातील जेद्दाहच्या सफासोबत मक्कामध्ये एका छोटेखानी सोहळ्यात त्यांचा निकाह झाला.

'इस एहसास को बयाँ करना मुश्किल है... इस मे एक बेहतरीन सी कशिश है.. आम्हाला एक गोंडस मुलगा झाला' असं ट्वीट इरफान पठाणने केलं आहे.

https://twitter.com/IrfanPathan/status/811110965693607941

2007 मधील टी20 विश्वचषक विजेत्या टीमचा इरफान भाग होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 100 हून जास्त विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक मिळवणारा तो दुसराच भारतीय आहे, तर मॅचच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव आहे.