डब्लिन : आयर्लंडला पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. कसोटी क्रिकेटमधला आयर्लंडचा हा पहिलाच सामना होता.


या सामन्यात केव्हिन ओब्रायनच्या झुंझार शतकाच्या जोरावर आयर्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 160 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पाकने हे आव्हान पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पाच विकेट्स राखून पार केलं.

पाककडून इमाम हक आणि बाबर आझमने अर्धशतकं झळकावली.

त्याआधी आयर्लंडचा केव्हिन ओब्रायन कसोटी शतक झळकावणारा पहिला आयरीश खेळाडू ठरला. पदार्पणाच्या सामन्यात केव्हिनने 217 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह 118 धावांची खेळी उभारली.

ओब्रायनच्या या खेळीमुळे आयर्लंडवर ओढवलेली डावाच्या पराभवाची नामुष्की टळली.