नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 15 पैसे, तर डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 21 पैसे वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू होतील.
कर्नाटक निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या काळात 24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. मात्र जसे मतदान संपले, तसे 14 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 21 पैशांनी महागलं होतं.
इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच आणि निकाल लागताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली.
पेट्रोलचे नवे दर :
मुंबई - 82.94 रुपये
दिल्ली - 75.10 रुपये
कोलकाता - 77.79 रुपये
चेन्नई - 77.93 रुपये
डिझेलचे नवे दर :
मुंबई – 70.88 रुपये
दिल्ली - 66.57 रुपये
कोलकात - 69.11 रुपये
चेन्नई - 70.25 रुपये
संबंधित बातमी : कर्नाटक निवडणुकीनंतर झटका, पेट्रोल-डिझेल
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटक निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2018 07:46 AM (IST)
इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच आणि निकाल लागताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -