Zaheer Khan : आयपीएल टी -20 क्रिकेटमधील ऋषभ पंत कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाजीतही अपयशी ठरला. हे अपयश रविवारीही कायम राहिले. जिंकण्यासाठी 216 धावांचे लक्ष्य असताना चौथ्या क्रमांकावर असलेला ऋषभ पंत केवळ 4 धावांवर बाद झाला . या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर ऋषभ पंतचे (Rishabh Pant) झहीर खानने सांत्वन केले . या मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लिलावात सर्वाधिक रक्कम मिळाल्यामुळे दडपणाखाली ऋषभ पंतची कामगिरी खालवत असल्याची टीका ऋषभवर होतेय. त्यावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननं ऋषभ पंतच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवलाय.  . (IPL 2025)

दिल्ली कॅपिटल्स सामन्यात सातव्या क्रमांकावर पाठवलेल्या ऋषभ पंतला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले . रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न बाद झाला . लिलावात सर्वाधिक रक्कम मिळाल्याने पंतवर दडपण आल्याने तो अपयशी होत असल्याची टीका त्याच्यावर होतेय . यावर ऋषभ पंत उत्तम नेतृत्व करत आहे . मधल्या फळीतील फलंदाजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असल्या तरी झहीर खाननं स्पष्ट केलं . अंतिम टप्प्यात संघ यशस्वी होईल असा विश्वासही झहीर खानने पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय .

ऋषभच्या पराभवावर झहीर खानची साथ

आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऋषभ पंतची कामगिरी या सीजनमध्ये निराशाजनक राहिली आहे . त्याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये केवळ 110 धावा केल्या आहेत . आणि सहा वेळा 10 धावांपर्यंत ही तो पोहोचू शकला नाही . त्याचे आत्तापर्यंतची एकमेव चांगली खेळी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 63 धावांची होती .मुंबई इंडियन्स विरुद्ध च्या 54 धावांच्या पराभवा दरम्यान विल जॅक्सने त्याला केवळ चार धावांवर बाद केले .दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक झहीर खानने ऋषभ पंतला पाठीशी घातलं आहे .ऋषभ पंत कर्णधार म्हणून सर्व योग्य निकष पूर्ण करत आहे .या पराभवाचा संबंध मी कोणत्याही गोष्टीशी जोडणार नाही .तो नेतृत्व करतोय .आणि त्याने या भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे याची मी खात्री देऊ शकतो .या टीममधील प्रत्येक व्यक्तीत सहजता आणण्यासाठी,त्यांचे ऐकून घेत आयपीएलमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागते.त्यासाठी तो ज्या प्रकारचा प्रयत्न करतोय तो आश्चर्यकारक आहे.असे जहीरने वानखेडे स्टेडियमवर एलएसजीच्या पराभवानंतर माध्यमांना सांगितले.

काय म्हणाला झहीर खान?

झहीर म्हणाला ,कर्णधार म्हणून तो सर्व गरजा पूर्ण करत आहे .मधली फळी फलंदाज म्हणून ऋषभ वर अवलंबून आहे .मला खात्री आहे की त्याच्याकडून आपल्याला जे हवे आहे ते होईल .फक्त सुरुवात होण्याची गरज आहे . आयपीएलच्या संपूर्ण सीझन मधील सर्वात महागडा खेळाडू असल्याने दडपणाखाली ऋषभ पंतचा गेम सातत्याने खालावत असल्याची टीका त्याच्यावर होते . ही टीका पूर्णपणे चुकीची असल्याचं झहीरने पत्रकार परिषदेत सांगितलं .पंत कर्णधार म्हणून महत्त्वाचा राहणार आहे .संघाला आशा आहे की 27 वर्षीय खेळाडू फलंदाजीने पुन्हा आपला पूर्वीचा फॉर्म मिळेल .असेही तो म्हणाला .

हेही वाचा:

RCB vs DC, IPL 2025: गुणी कृणाल बंगळूर वर विजयाचा गुलाल!