RCB vs DC, IPL 2025: रविवारी झालेल्या सामन्यात बंगळूर संघाने विजयाचा गुलाल उडवून गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाण्याचा मान मिळविला... धावांचा पाठलाग करीत असताना नेहमी विराट खेळतो आज सुद्धा खेळला ... अर्धशतक झळकविले... पण आज बंगळूर संघाकडून बहारदार कामगिरी केली ती अष्टपैलू कृणाल पांड्या याने... 47 चेंडूत  नाबाद 73 धावा आणि त्यात 4 षटकार...आणि गोलंदाजी करून 1 बळी... आज त्याने ज्या 73 धावा केल्या त्या दिल्ली संघाची गोलंदाजी काय होती... स्टार्क.. मुकेश.. चमीरा, कुलदीप , अक्षर.. विप्रज..या प्रत्येकाने (चमीरा वगळून) आपापल्या गोलंदाजीनं या स्पर्धेत छाप पाडली आहे...आज नाणेफेक जिंकून बंगळूर संघाने दिल्ली संघाला प्रथम फलंदाजी दिली... आणि बलवान गोलंदाजीसमोर पाठलाग करण्याचे आव्हान स्वीकारले..या निर्णयात सुद्धा बंगळूर संघाचा आत्मविश्वास दिसत होता..

अभिषेक पोरेल याने  2 षटकार मारून उत्तम सुरुवात केली..पण हेझल च्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो बाद झाला..आणि दिल्ली संघाची धावगती मंदावली... यश दयाळ याच्या एका लेन्थ चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात करुण बाद झाला... राहुलने 41 धावा केल्या पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त 105 इतका होता...शेवटी स्टब ने 18 चेंडूत 34 धावा केल्या आणि धावसंख्या 162 पर्यंत नेवून ठेवली..

दिल्ली संघाच्या गोलंदाजी पुढे ही धावसंख्या पुरेशी ठरली असती... पण विराट पाय रोवून उभा राहिला आणि कृणाल त्याच्या आयुष्यातील एक सुंदर खेळी खेळून गेला.अक्षरने 4 षटकात फक्त 19 धावा देऊन देवदत्त ला भोपळा ही फोडू दिला नाही... आणि करुण नायर याने एका अचूक फेकीवर रजत याला धावचीत केले आणि दिल्ली संघाची अवस्था तीन बाद 30 अशी केली... पण नंतर 84 चेंडूत 119 धावांची खेळी भागीदारी करून बंगळूर संघाने राजधानी जिंकली...

कृणाल तसा मुंबई इंडियन्स या संघाकडून आणि नंतर लखनौ संघाकडून खेळणारा... जेव्हा तो मुंबई कडून खेळत होता तेव्हा रोहित शर्मा त्याच्याकडे पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करून घेत असे... तर फलंदाजीत त्याला वरचा क्रमांक दिला जाई... जेव्हा मुंबई संघाची स्काऊट टीमने त्याचा अहवाल मुंबई व्यवस्थापन संघाकडे दिला तेव्हा त्याची षटकार मारण्याची मोठी क्षमता यावर भाष्य केले होते. .. गोलंदाजी करीत असताना त्याने कित्येक वेळा ए बी डीविलर्स चा बळी मिळवून मुंबई संघाला विजय मिळवून दिला होता...

या स्पर्धेत तो जुना कृणाल पाहायला मिळत आहे... त्याने या स्पर्धेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केलं.. त्याने आज चमीराच्या गोलंदाजीवर एक पिक अप,मुकेश च्या गोलंदाजीवर एक हूक आणि लगेच दुसऱ्या लेन्थ चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर वरून षटकार खेचले...हे करीत असताना तो 3 बाद 30 अशा वेळी मैदानात आला ...आणि समोर आधुनिक युगातील महान खेळाडू विराट आहे...त्या महानायकाला दुय्यम भूमिका देऊन त्याने आक्रमण केले...आणि जो सामना दिल्ली संघाचा झाला असता त्याने तो 19 व्या षटकात बंगळूर संघाचा केला...तो जेव्हा गोलंदाजी करीत असतो तेव्हा त्याला आपल्या मर्यादा माहित असतात.. आपल्या कडील संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून तो अचूक गोलंदाजी करतो..आज बंगळूर संघाकडे एक सुद्धा विजेतपद नाही. ते जेव्हा जेव्हा स्पर्धेत अपयशी ठरत होते तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी नाही.  आणि मधली फळी कमकुवत आहे असे म्हटले जायचे...काल भुवनेश्वर आणि हेझल स्वप्नवत गोलंदाजी करीत आहेत..काल भुवनेश्वर याने 3 तर हेझल ने 2 बळी घेतले..बंगळूर संघाकडे आज टीम डेव्हिड सारखा फिनिशर आहे..रजत सारखा उत्तम कर्णधार आहे... देवदत्त देवदूतसारखा येऊन संघाला अडचणीतून बाहेर काढीत आहे...विराट त्याच्या जुन्या  फॉर्म मध्ये आहे.काल बंगळूर ने राजधानी जिंकली...त्यांचे 10 सामने झाले आहेत त्यांचे पुढील सामने कोलकाता.. चेन्नई..हैदराबाद.. लखनौ या संघासोबत आहेत ... त्यामुळे तसे आव्हान छोटे आहे... आज ते एक नंबर वर आहेत... ते एक नंबरवरच राहून आपल्याला विजेतपदसाठी अधिक संधी देतील...यावेळेस बंगळूर विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी संघाची देहबोली आहे.