Yuzvendra Chahal : आयपीएलच्या 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थानने केकेआरला 7 धावांनी मात दिली खरी पण केकेआरने दाखवलेल्या खेळाचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राजस्थानच्या भव्य अशा 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 210 धावा करु शकला अवघ्या सात धावांनी त्यांचा पराभव झाला. दरम्यान या चुरशीच्या सामन्यात राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) हॅट्रिकनंतर त्याच्या पत्नीची आनंदी रिएक्शन चांगलीच व्हायरल होत आहे.


राजस्थानच्या 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 16 व्या ओव्हरपर्यंत केकेआरने 4 विकेट्स गमावत 178 रन केले होते. ज्यामुळे त्यानंतर केकेआरला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये केवळ 40 धावांची गरज होती. त्यांच्या हातात 6 विकेट्सही होते. पण तेव्हाच राजस्थानने हुकूमी एक्का चहलल ओव्हर दिली. चहलने पहिल्या चेंडूवर वेंकटेश अय्यरला (6) संजूच्या मदतीने स्टपिंगने बाद केलं. पुढील दोन चेंडूत त्याने एक धाव दिली. ज्यानंतर त्याने एक वाईड बॉल फेकला. पण चौथ्याच चेंडूवर चहलने श्रेयसला पायचीत केल. नंतर पाचव्या चेंडूवरक शिवम मावीला झेलबाद करवलं आणि अखेरच्या सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्सलाही बाद करत हॅट्रिक नावावर केली. त्याच्या या हॅट्रिकनंतर संपूर्ण राजस्थानचे चाहते अक्षरश: नाचत होते, यावेळी त्याची पत्नी धनश्री देखील अत्यंत आनंदी दिसत होती.



केकेआरचा सात धावांनी पराभव


राजस्थानच्या लक्ष्यानं दिलेल्या 218 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूवर सुनील नारायण रनआऊट झाला. त्यानंतर सलामीवीर आरोन फिंच आणि श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला. आरोन फिंचनं 58 तर, श्रेयस अय्यरनं 85 धावांची तुफानी खेळी केली. आरोन फिंच आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेरच्या दोन षटकात उमेश यादवनं दोन षटकार मारून कोलकात्याच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, त्यालाही संघाला विजय मिळवता आला नाही. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-