Yashasvi Jaiswal, Tilak Verma, Rinku Singh : यंदाचा आयपीएलच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटूही नव्या खेळाडूंना पाहून प्रभावित झाले आहेत. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऋतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), रिंक सिंह (Rinku Singh), तिलक वर्मा (Tilak Verma), नेहाल वढेरा यासारख्या अनेक तरुण खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तुषार देशपांडे (Tushar Deshpande), मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) आणि सुयश शर्मा (Suyash Sharma) यांसारख्या युवा खेळाडूंच्या गोलंदाजीचाही कहर पाहायला मिळाला आहे.


'तीन युवा खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळू शकतं'


आयपीएल 2023 मधील युवा खेळाडूंच्या कामगिरीने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही खूप प्रभावित झालं आहेत. शास्त्री यांनी विशेषतः यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा या युवा खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तसेच या तिन्ही खेळाडूंचा दमदार फॉर्मच्या पाहता हे खेळाडू विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठीही दावेदार असल्याचं मत शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे.


टी इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचा दावा


यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा यांच्यासाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम उत्तम ठरला आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मध्ये 13 सामन्यांमध्ये 575 धावा केल्या आहेत. यशस्वीच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावल्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे.


कोलकाताचा स्टार युवा खेळाडू रिंकू सिंहनेही चमकदार कामगिरी केली आहे. 25 वर्षीय रिंकू सिंहने कोलकाता संघासाठी 50.88 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय मुंबई इंडियन्स संघातील डावखुरा फलंदाज तिलक वर्मानेही यंदाच्या मोसमात आपली छाप पाडली आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये 274 धावा केल्या आहेत.


यशस्वी जयस्वालचं जय शाहांकडून कौतुक


राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या भन्नाट फॉर्मात आहे. यशस्वी जयस्वाल याला टीम इंडियात स्थान द्यायला हवं, असं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. जय शाह यांनीही ट्वीट करत यशस्वीच्या फलंदाजीचं कौतुक केलं. त्यांच्या ट्वीटनंतर यशस्वी लवकरच टीम इंडियात स्थान मिळवेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 : विराट कोहलीनं रोहित शर्माचं टेन्शन वाढवलं! बंगळुरुच्या विजयामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? समीकरण जाणून घ्या