IPL 2023 Orange & Purple Cap : राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने पंजाब विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत चार गडी राखून सामना आपल्या बाजूने केला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा चार विकेट्सने पराभव केला. यासोबतच राजस्थानची प्लेऑफमध्ये (Rajsthan Royals) पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) आणि देविदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यासोबतच हिटमायरने 46 धावांची चमकदार खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 


यंदाच्या हंगामात राजस्थानचा फलंदाज यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली आहे. आता यशस्वी ऑरेंज कॅपच्या (Orange cap) यादीमध्ये 625 धावांसह शुभमन गीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. यशस्वीने 14 सामन्यांमध्ये 48.08 सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत या हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतकांची यशस्वी कामगिरी केली आहे.   


ऑरेंज कॅपच्या यादीत सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. बंगळुरुच्या संघाच्या कर्णधारने 13 सामन्यांमध्ये 58.50 सरासरीने एकूण 702 धावा केल्या आहेत. फाफने आतापर्यंतच्या एकाही सामन्यात जरी शतक झळकावलं नसेल तरीही त्याने या हंगामात एकूण आठ अर्धशतके ठोकली आहेत. 


या यादीत तिसऱ्या स्थानावर गुजरातच्या संघाच्या सलामीवीर फलंदाज शुभमन गील आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 576 धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहली देखील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकून चौथ्या स्थानावर पोहचला आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने हैदराबादविरोधात झंझावाती फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून विराट कोहलीने तुफानी फटकेबाजी केली. विराट कोहलीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने चार षटकार आणि 12 चौकार लगावले. कोहलीने 13 सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने एकूण 538 धावा केल्या आहेत. 


पर्पल कॅपसाठी शमी आणि राशिदमध्ये लढत 


पर्पल कॅपच्या दावेदारीसाठी देखील गोलंदाजांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळत आहे. पर्पल कॅपसाठी गुजरात संघाच्या दोन खेळाडूंमध्ये लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूंनी सध्या प्रत्येकी 23-23 विकेट घेतल्या आहेत. पण चांगल्या सरासरीमुळे पर्पल कॅप सध्या शमीच्या ताब्यात आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर 21 विकेट घेत युजवेंद्र चहल आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबईचा पियुष चावला आहे, त्याने 20 विकेट घेतल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 


PBKS vs RR, IPL 2023 : रोमांचक सामन्यात राजस्थानची पंजाबवर मात, यशस्वी आणि पडिक्कलचं अर्धशतक