Ruturaj Gaikwad And Ishan Kishan As Standby Players For WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघातील काही खेळाडूंची नावे पहिल्यापासूनच निश्चित होती. तर अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात पुनरागमन केलेय. मुख्य संघाशिवाय बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी स्टँड बाय खेळाडूंचीही निवड केली हे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, ईशान किशन यांच्यासह इतर काही खेळेडूंचा समावेश आहे.
WTC ची फायनल सात ते ११ जून यादरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात कसोटी विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. प्रमुख संघासोबत काही स्टँडबाय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, सर्फराज खान, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार या खेळाडूंना स्टँड बाय खेळाडू म्हणून निवडले आहे. या खेळाडूंनाही टीम इंडियासोबत इंग्लंडला पाठवण्यात येणार असल्याचे समजतेय.
सध्या आयपीएलमधील टीम इंडियातील प्रमुख खेळाडू व्यस्त आहेत. २८ मे पर्यंत आयपीएलचे सामने रंगणार आहेत. त्यानंतर टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी सुरु होणार आहे. बीसीसीआय काही सराव सामन्याचे नियोजन करु शकते, जेणेकरुन इंग्लंडमधील परिस्थितीसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंना जुळवून घेता येईल. आयपीएल प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर जाणाऱ्या संघातील खेळाडू राहुल द्रविडसोबत २३ मे पर्यंत इंग्लंडला रवाना होणार आहेत.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.