Ravindra Jadeja's 300th T20 Match : चेन्नई आणि राजस्थान यांच्यात जयपूरच्या मैदानात सामना सुरु आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. चेन्नईचा अष्टपैलू रविंद्र जाडेजा याचा हा ३०० वा टी२० सामना आहे. त्याशिवाय चेन्नई सुपर किंग्सकडून जाडेजा आज १५० वा टी २० सामना खेळत आहे.
जाडेजाचा खास क्लबमध्ये प्रवेश -
रविंद्र जाडेजा आज ३०० वा टी२० सामना खेळत आहे. यासह तो ३०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पोहचलाय. या लिस्टमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यत ४१४ टी २०सामने खेळले आहेत. आतापर्यंत आठ भारतीय खेळाडूंनी ३०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचाही समावेश आहे. जाडेजा आज ३०० टी २० सामना खेळत आहे. तर चेन्नईकडून त्याचा आजचा १५० वा सामना आहे.
300 पेक्षा जास्त टी २० सामने खेळणारे भारतीय खेळाडू कोणते? पहिल्या स्थानावर कोण ? यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकने आतापर्यंत ३८१ टी २० सामने खेळले आहेत. पाहा संपूर्ण यादी....
रोहित शर्मा- 414 टी20 सामने.
दिनेश कार्तिक- 381 टी20 सामने.
एमएस धोनी- 369 टी20 सामने
विराट कोहली- 368 टी20 सामने
सुरेश रैना- 368 टी20 सामने
शिखर धवन- 322 टी20 सामने.
रवि अश्विन- 304 टी20 सामने
रविंद्र जडेजा- 300 टी20 सामने
रविंद्र जाडेजाचे आतापर्यंतचे टी २० करिअर कसे आहे.....
राजस्थानविरोधातील सामना रविंद्र जाडेजाचा ३०० वा टी २० सामना आहे. रविंद्र जाडेजा याने 299 टी20 सामने खेळला आहे. यामधील 213 डावात फलंदाजी करताना त्याने 25.40 च्या सरासरीने आणि 128.78 च्या स्ट्राइक रेटने 3226 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान रविंद्र जाडेजाचा सर्वोच्च स्कोर 62* इतका आहे.
त्याशिवाय टी२० मधील 268 डावात त्याने गोलंदाजी केली. जाडेजाने 30.11 च्या सरासरीने 204 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकॉनमी 7.56 इतकी राहिली आहे. पाच बाद १६ हा सर्वोच्च गोलंदाजी आहे.
आयपीएलमधील यंदाची कामगिरी कशी आहे ?
यंदाच्या हंगामात रविंद्र जाडेजा याने सरासरी कामगिरी केली आहे. रविंद्र जाडेजा सात सामन्यात खेळला आहे. सात सामन्यातील पाच डावात फलंदाजी करताना जाडेजाने 57 धावा केल्या आहेत. सात डावात गोलंदाजी करताना रविंद्र जाडेजा याने दहा विकेट घेतल्या आहेत.