RR vs CSK, IPL 2023 : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  राजस्थानच्या संघात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. राजस्थानने ट्रेंट बोल्ट याला प्लेईंग ११ च्या बाहेर बसवले आहे. बोल्टच्या जागावेर अॅडम झम्पा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. धोनीने चेन्नईच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ धोनीने कायम ठेवला आहे. 


राजस्थान रॉयल्सला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात कोलकाताववर विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाची प्लेईंग ११ पाहूयात..


राजस्थान रॉयल्सचे अकरा शिलेदार कोणते ? 


यशस्वी जायसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन ( कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम जम्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.


चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन- 


ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी ( कर्णधार आणि विकेटकीपर), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे,  महिश तिक्ष्णा.










 


Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करतो. पण आज संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


CSK vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड दिसून आलं आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 सामने जिंकले असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.