Kiara Advani and Kriti Sanon: महिला प्रीमियर लीगची (WPL) आजपासून (4 मार्च) सुरुवात होत आहे. रंगतदार उद्घाटन सोहळ्याने WPL ची सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्याच्या अवघ्या दोन तास आधी हा उद्घाटन सोहळा सुरु होईल. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) धमाकेदार नृत्य सादर करणार आहेत. प्रसिद्ध गायक एपी ढिल्लो (AP Dhillon) आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. अशा परिस्थितीत हा उद्घाटन सोहळा 5.30 वाजता सुरु होईल. दुपारी चार वाजता या सोहळ्यासाठी डी. वाय. पाटील यांच्या हस्ते प्रवेशद्वार उघडण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची तिकिटं Bookmyshow अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन आपल्या अदा आणि धमाकेदार डान्स परफॉर्मन्सनी सर्वांना घायाळ करणार आहेत. तर एपी ढिल्लन हा पंजाबी गायक आहे, ज्याने 'ब्राउन मुंडे', 'एक्सक्यूज' आणि 'इनसेन' सारखी सुपरहिट गाणी गायली आहेत.
ओपनिंग सेरेमननंतर मुंबई आणि गुजरात संघांमध्ये टक्कर
आजपासून WPL च्या पहिल्या हंगामाची दिमाखदार सुरुवात होणार आहे. तब्बल दीड तास WPL ची ओपनिंग सेरेमनी सुरु राहिल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता टॉस होईल आणि पुढच्या अर्धा तासात WPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्ट्स यांच्यात रंगेल. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. तर गुजरातची मदार ऑस्ट्रेलियन विकेटकीपर, फलंदाज बेथ मूनीच्या खांद्यावर असणार आहे.
कुठे पाहाल लाईव्ह टेलिकास्ट?
महिला प्रीमियर लीगची ओपनिंग सेरेमनीचं लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स-18 1 आणि स्पोर्ट्स-18 1HD चॅनल्सवर पाहता येईल. या सेरेमनीची लाईव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमावरही उपलब्ध असेल.
WPL मध्ये कोणत्या संघांचा समावेश?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी झाले असून सर्व सामने नवी मुंबई आणि मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :