Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाला सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या T20 लीगचा पहिला सामना उद्या म्हणजेच 4 मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये खेळवला जाईल. या संपूर्ण हंगामाचे स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
जर दोन्ही संघांबद्दल बोलायचं झालं तर त्यात उत्कृष्ट महिला खेळाडूंची नावे आपल्याला पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू बेथ मुनी गुजरात जायंट्स संघाची कर्णधारपदी विराजमान होणार आहे, तर हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स महिला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. WPL ची पहिली आवृत्ती सुरू होण्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, जी प्रतिक्षा आता जवळपास संपली आहे. या पहिल्या आवृत्तीत एकूण 5 फ्रँचायझी सहभागी होत आहेत. ज्यामध्ये गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघाव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाचा समावेश आहे.
कोणत्या खेळाडूंकडे नजरा?
पहिल्याया सामन्याबाबत दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, ऍशले गार्डनर व्यतिरिक्त सोफी डंकले देखील गुजरात जायंट्स संघात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या महिला संघात हेली मॅथ्यूजशिवाय नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या या हंगामातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कोणते संघ सहभाग घेत आहेत?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
हे देखील वाचा-