WPL 2023, MI vs UPW:

  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (24 मार्च) अत्यंत महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आणि युपी वॉरियर्स (MI vs UPW) हे दोन संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरत आहेत. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा एलिमिनेटरचा सामना रंगत असून जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान युपी संघानं नुकतीच नाणेफेक जिंकत नुकतीच गोलंदाजी निवडली आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमातील हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि करो या मरो असा आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत प्रत्येकी 8-8 सामने खेळले असून मुंबई इंडियन्सने केवळ दोन सामने गमावले असून 6 विजय मिळवले आहेत. तर युपी संघाने 4 सामने गमावले असून 4 सामने जिंकले आहेत.  तसंच दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंचा भरणा असून मुंबईची मदार कर्णधार हरमनप्रीतवर तर युपीची मदार एलिस हेली हिच्यावर आहे. त्यामुळे एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो... 


कसे आहेत दोन्ही संघ?


आजच्या या महत्त्वच्या सामन्यात दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 चा विचार केल्यास मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. दुसरीकडे यूपी वॉरियर्स संघाने केवळ एक बदल केला असून ग्रेस हॅरिस हीला संघात संधी दिली असून शबनिम इस्माईलला विश्रांती दिली गेली आहे.


मुंबई इंडियन्सची प्लेईंग-11: हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक


यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (w/c), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड


यूपी वॉरियर्सचे प्लेईंग-11: एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड


थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


हे देखील वाचा-