KL Rahul will not play against LSG : आयपीएल 2025 मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना आहे. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. संघातील स्टार खेळाडू केएल राहुल पहिल्या सामन्याला मुकणार आहे. पण, दुसऱ्या सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल अशी अपेक्षा आहे. 


केएल राहुल लवकरच होणार बाबा


गेल्या वर्षीपर्यंत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करणारा केएल राहुल आता या वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आहे. पण तो त्याच्या जुन्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळू शकणार नाही. केएल राहुल बाबा होणार आहे. म्हणूनच तो संघ सोडून त्याची पत्नी अथिया शेट्टीकडे गेला आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना विशाखापट्टणममधील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, संघ व्यवस्थापनाशी बोलल्यानंतर राहुल परतला आहे. क्रिकबझने वृत्त दिले की, तो रविवारी रात्रीच मुंबईत परतला. असे म्हटले जात आहे की, अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे, म्हणूनच तो अचानक टीम सोडून पत्नीकडे गेली आहे.






दुसऱ्या सामन्यात केएल राहुल येणार 


दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा सामना 30 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्याला अजून काही दिवस आहे, तोपर्यंत केएल राहुल पुन्हा संघात सामील होईल अशी आशा आहे. पण, केएल राहुलने आयपीएलच्या या हंगामातील पहिला सामना खेळला असता तर बरे झाले असते, कारण हा सामना त्याच्या जुन्या संघाविरुद्ध म्हणजेच एलएसजीविरुद्ध होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला त्यांच्या संघाचा कर्णधार बनवले आहे.


दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलसाठी मोजले 12 कोटी 


केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाकडून खेळताना त्याने अनेक चांगली कामगिरी केली होती. पण, तो भारताच्या टी-20 संघाबाहेर आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करून स्वतःला सिद्ध करणे हे त्याचे ध्येय असेल आणि त्यानंतर त्याला भारतीय संघातही सामील होण्याची संधी मिळू शकते. एलएसजीमधून बाहेर पडल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने 12 कोटी रुपये देऊन केएल राहुलला त्यांच्या संघात समाविष्ट केले.