Virat kohli, IPL 2024 : 'चीते की चाल, बाज की नजर और विराट कोहली के हुनर पर संदेह नहीं करते'.. होय विराट कोहलीनं केलेला थ्रो पाहिल्यानंतर असाच म्हणावे लागले. विराट कोहलीने धर्मशाला मैदानावर मोठी धाव घेत शशांक सिंह याला धावबाद केले. विराट कोहलीनं स्टम्पवर अचूक थ्रो करत आरसीबीला विजय मिळवून दिला. पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने अचूक थ्रो करत शशांक सिंह याला धावबाद केले.
नेमकं झालं काय ?
लॉकी फर्गुसन 14 वं षटक घेऊन आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॅम करन यानं एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं चेंडू टोलावला अन् धाव घेण्यास शशांकला आमंत्रित केले. पण विराट कोहली धावत येत एका हाताने चेंडू घेत थेट थ्रो केला. विराट कोहलीने हवेत ड्राईव्ह मारत अचूक थ्रो केला. विराटने फेकलेला थ्रोने दांड्या उडवल्या. विराट कोहलीच्या थ्रोमुळे फॉर्मात असलेला शशांक सिंह धावबाद झाला. शशांक सिंह 19 चेंडूमध्ये 37 धावांवर खेळत होता. शशांकने फटकेबाजी सुरु केली होती. पण विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे त्याची खेळी संपुष्टात आली.
पाहा व्हिडीओ -
विराट कोहलीने मारलेला अचूक थ्रो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचा व्हिडीओ आणि फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीने 7 षटकं फलंदाजी केली. त्यानंतर आराम न करता फिल्डिंगही केली. विराट कोहलीने फिल्डिंगमध्येही आपलं काम चोख बजावले. विराट कोहलीच्या अचूक थ्रोची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकांकडून त्याच्यावर कौकुताकाचा वर्षाव होत आहे.
आरसीबीचा पंजाबवर विजय -
करो या मरोच्या सामन्यात आरसीबीने पंजाबचा दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 92 धावांच्या झंझावती खेळीच्या बळावर आरीसीबीने 241 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल पंजाबच्या संगाला 200 धावांचा पल्लाही पार करता आला नाही. आरसीबीकडून स्वप्निल सिंह, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्गुसन यांनी भेदक मारा केला.