IPL 2021, DC vs SRH : आयपीएलच्या क्रिकेट कुंभात दर दिवशी, प्रत्येक सामन्यात असं काही घडतं, ज्याची प्रचंड चर्चा होतेच. सध्या दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यातील अशाच एका क्षणाची चर्चा सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा त्यामुळं प्रकाशझोतात आला आहे. 


विजय शंकर यानं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी असताना असा काही विचित्र पद्धतीनं चेंडू फेकला, की डगआऊटमध्ये असणाऱ्या Greame Swann आणि ब्रेट ली यांनाही त्याच्या गोलंदाजीवर काही क्षणांसाठी विश्वासच बसेना. विजय शंकरच्या हातातून चेंडू निसटला आणि उंचावर उसळला. हा चेंडू खाली येण्यासाठीही काही सेकंदांचा वेळ लागला. ज्यानंतर तो थेट पंतच्या खांद्यापाशी खाली आला. 


सोशल मीडियावर विजय शंकरच्या या गोलंदाजीवर प्रतिक्रिया देत अनेक मीम्सही व्हायरल झाले. या मीम्समध्ये नेटकऱ्यांनी विजय शंकरची चांगलीच खिल्ली उडवल्याचं दिसून आलं.


Mt Annapurna-I : पुण्याच्या गिरीप्रेमीकडून अन्नपूर्णा-एक सर, तीन गिर्यारोहकांनी गाठला माथा






















कसा होता दिल्ली विरुद्ध हैदराबाद या संघांमधील सामना? 


दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या रोमांचक सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये हैदराबादवर मात केली. सुपरओव्हरमध्ये हैदराबादनं दिल्लीसमोर सहा चेंडूत 8 धावांचं आव्हान दिलं होतं. सुपरओव्हरमध्ये हैदराबादच्या केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नरला केवळ सातच धावा करता आल्या. दिल्लीच्या शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान सहा चेंडूत पूर्ण करत विजय साजरा केला. सुपर ओव्हर देखील रोमांचक झाली. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला.  या विजयासह दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.