Mt Annapurna-I : पुण्याच्या गिरीप्रेमीकडून अन्नपूर्णा-एक सर, तीन गिर्यारोहकांनी गाठला माथा

Continues below advertisement

पुणे : गिरीप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माऊंट अन्नपूर्णा-1 (8091 मीटर्स उंच) वर यशस्वी चढाई केली. ज्येष्ठ गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram