MI vs RCB : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या तळाच्या संघामध्ये लढत होणार आहे. याच लढतीबाबत इनसाइड स्पोर्ट खूपच अनोख्या पद्धतीमध्ये भविष्यवाणी केली आहे, त्यासाठी श्वानाची मदत केली आहे. भविष्यवाणीसाठी एका डब्ब्याला मुंबई आणि दुसऱ्या डब्ब्याला मुंबई इंडियन्सचं स्टिकर लावलं आहे. हा चॅरेटी इव्हेंट असल्याचेही सांगण्यात आले आहे. ज्या डब्ब्याकडे श्वान आकर्षित होतील, तो संघ सामन्यात बाजी मारेल, असं आधीच कळवण्यात येतेय. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 


कोणता संघ जिंकेल, यासाठी केलेल्या या टास्कमध्ये श्वानाने मुंबई इंडियन्सला पसंती दर्शवल्याचं दिसतेय. श्वानाचा हा प्रकार अतिशय मनोरंजक आणि अनोखा राहिला, कारण प्रिडिक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 5-4 च्या फरकाने पराभव केला. दरम्यान, भविष्यवाणीच्या या अनोख्या प्रयोगाला हास्यस्पद अन् पोरखळ म्हटलं जाऊ शकते. पण यामुळे भटके श्वानाची सुरक्षेसाठी हा चांगला प्रयोग आणि प्रयत्न असेल. याआधी फुटबॉल वर्ल्डकप 2010 सान्यावेळी पॉल नावाच्या ऑक्टोपस खूपच प्रसिद्ध जाला होता. आयपीएल सामन्यासाठी श्वानाचा प्रयगो करण्यात आलाय. पण श्वानाची भविष्यवणी खरी ठऱणार का? हे पाहावं लागणार आहे.






MI आणि RCB : हेड टू हेड आकडे काय सांगतात ?


आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये 32 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 18 वेळा मुंबईने बाजी मारली आहे, तर 14 वेळा आरसाबीचा विजय झाला आहे. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे,  या मैदानावर मुंबईचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यासाठी श्वानाने केलेली भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता आहे. कारण, वानखेडेवर मुंबईचा रेकॉर्ड चांगला आहे. दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये मुंबई आणि आरसीबीची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत. आरसीबीला पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय, तर मुंबईला चार सामन्यात एका विजयावर समाधान मानावे लागले आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.