Virat Kohli-Gautam Gambhir Controversy : लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या वादामुळेच गाजला. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. सामन्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार भांडण झाले हते. या प्रकरणावर विराट कोहलीने लिखीत स्वरुपात आपली बाजू बीसीसीआयकडे मांडली आहे. त्यासोबतच सामन्यादरम्यान काय झाले होते.. अन् त्यावेळी विराटची भूमिका कय होती.. याबाबत स्पष्टिकरण दिलेय. तसेच दंडाच्या रक्कमेवरही नाराजी व्यक्त केली आहे.
बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना मॅच फीच्या 100% दंड ठोठावला, तर नवीनला 50% दंड ठोठावला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी आयपीएल कोड ऑफ कंडक्ट लेवल २ चे उल्लंघन केल्याचे निदर्शास आले होते. त्यामुळे त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला. पण आता विराट कोहलीने बीसीसीआयला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. विराटने पत्रात असेही नमूद केले आहे की त्याने काहीही चुकीचे केले नाही. सामन्यादरम्यान नवीन-उल-हक किंवा गौतम गंभीरशी असे काहीच केलेले नाही की ज्यासाठी इतका मोठा दंड ठोठावण्यात यावा. सामन्याच्या 100 टक्के दंड आकारण्यात आल्याने विराटने नाराजी व्यक्त केली.
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तेव्हा काय झाले बोलणं?
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाली. सामन्यानंतर प्रेक्षपण सुरु होते.. तेव्हा दोन दिग्गज खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.. पण या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरु होते.. हे समजत नव्हते.. पीटीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं त्यावेळी काय बोलणं झाले होते? याबाबत माहिती दिली. पाहा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काय बोलणं झालेय...?
गौतम गंभीर - काय म्हणतोय बोल (What were you saying)
विराट कोहली - मी तुम्हाला काही म्हणालोच नाही... तुम्ही मध्ये का येत आहात? (Why are you cominig in beetween when i haven't told you anything)
गौतम गंभीर - तू जर खेळाडूला काही बोलला आहेस... म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस.... (you abused my player and thats like abusing my family)
विराट कोहली - मग तुमच्या कुटुंबाला नीट सांभाळा (then you take care of your family)
गौतम गंभीर - आता तू मला शिकवणार (so noe i have to learn from you)