Kohli in IPL, IPL, IPL 2023, Virat Kohli, Anushka Sharma : भारतीय क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट आयपीएल 2023 मध्ये तुफान खेळी करताना पाहायला मिळतोय. विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या म्हणजेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे. 


सध्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेत आहे. यासोबतच विराट आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. कोहलीच्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या आईने कोहलीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. याबाबतील अनेकांना माहितही नसेल. मात्र, त्याच्या बालमित्राच्या आईने विराटबद्दलची अनेक गुपित उघड केली आहेत. 


'लहानपणापासूनच विराटला अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं'


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विराटच्या मित्राची आई आणि बालपणीच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. विराट कोहलीला लहानपणापासून अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती, असं त्याच्या मित्राच्या आईने सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ :






विराटबद्दलची गुपितं उघड


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराटचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma), बालपणीचा मित्र शलज (Childhood Friend Shalaj) आणि त्याची आई यांच्याशी झालेला संवाद आहे. दोघांनी कोहलीशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. शलजची आई नेहा यांनी सांगितलं की, माझा मुलगा आणि विराट राजकुमार शर्मा यांच्या क्रिकेट अकादमीत क्रिकेट शिकण्यासाठी जायचे. त्यानंतर मी दोघांसाठी जेवण बनवायचे. विराटला मी बनवलेलं जेवण खूप आवडायचं. एकदा मदन क्रिकेट अकादमीमध्ये मॅच सुरू होती. तिथे जाहिरातीचे पोस्टर चिकटवले होते. ते पोस्टर पाहून विराट म्हणाला होता की, ''एक दिवस मी मोठा होईन आणि अभिनेत्रीसोबत लग्न करेन.''


शलजच्या आईने पुढे सांगितलं की, "राजकुमार सरांच्या अकादमीत मी विराटला पहिल्यांदा पाहिलं. मी त्या दोघांसाठी रोज जेवणाचा डबा घेऊन जायचे. विराटला जे पदार्थ खायची इच्छा असेल, ते तो मला आधीच सांगायचा आणि मी ते जेवण बनवून घेऊन जायचे. मी जेव्हा जेवणाचा डबा नेला ती तो सर्वांच्या आधी जेवायचा." 


'बालपणापासूनच खोडकर आणि कष्टाळू विराट'


विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहली बालपणीचा विराटचा स्वभाव कसा होता हे सांगितलं. राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, "13 मे 1998 रोजी विराट त्याचे वडील आणि भावासोबत अकादमीमध्ये आले होते. त्याच्यामधील प्रतिभा काही दिवसांतच आम्हाला कळली. तो खूप खोडकर आणि सक्रिय होता. त्याला सर्व काही करायचे होते आणि तो सुरुवातीपासून खूप कष्टाळू होता. तो खूप मेहनत करत होता. त्याच्यात खूप आत्मविश्वासही होता."