Virat Kohli IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने खोऱ्याने धावा जमवल्या. विराट कोहली यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. पण मोक्याच्या क्षणी विराटच्या बॅटला गंज लागतो, अशी स्थिती आहे. दबावात विराट कोहलीची बॅट शांत राहते. प्लेऑफमधील आकडे पाहिल्यास तुम्हालाही विश्वास बसणार नाही. 


विराट कोहलीने 15 सामन्यात 741 धावांचा पाऊस पाडलाय. त्याने 38 षटकारही ठोकले आहेत. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. पण प्लेऑफमध्ये विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर विराट कोहलीने विकट फेकली. एलिमेनटरच्या सामन्यात राजस्थानविरोधात विराट कोहली 33 धावा काढून बाद झाला. विराट कोहलीचा प्लेऑफमधील रेकॉर्ड अतिशय खराब राहिलाय. 


विराट कोहलीला प्लेऑफमध्ये धावा काढता आल्या नाही. क्रिक इन्फोच्या आकडेवारीनुसार, विराट कोहलीला प्लेऑफमधील 15 सामन्यात फक्त 341 धावा करता आल्या आहेत. विराच कोहलीला फक्त दोन अर्धशतके ठोकता आलीत. नाबाद 70 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. प्लेऑफच्या सामन्यात विराट कोहलीला 27 च्या सरासरीने धावा काढत्या आल्या. पण आयपीएलच्या त्याच्या आकड्यावर नजर मारल्यास ही आकडेवारी शुल्लक दिसते. विराट कोहलीने 252 आयपीएल सामन्यात 8 हजार पेक्षा जास्त धावा केल्यात.  पण दबावाच्या सामन्यात कोहलीची बॅट शांतच राहिली, याचा फटका आरसीबीला बसलाय. आरसीबीला 17 वर्षांत एकदाही चषक उंचावता आला नाही. तीन वेळा ते चषकाजवळ पोहचले, पण जिंकता आला नाही. एलिमेनटरमध्ये आरसीबीचा चार वेळा पराभव झालाय. तर क्वालिफायर 2 मध्येही आरसीबीचे आव्हान संपुष्टात आलेय.  


आयपीएलमध्ये विराटला तोड नाही - 
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. 17 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 2008 तते 2024 या 17 वर्षांमध्ये विराट कोहलीने 8000 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 252 सामन्यात 8000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 55 अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीने 132 च्या स्ट्राईक रेटने आणि 39 च्या सरासरीने आयपीएलमध्ये धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 705 चौकार ठोकले आहेत., तर 272 खणखणीत षटकारही ठोकले आहेत. विराट कोहलीने फिल्डिंगमध्ये 115 झेल घेण्याचा पराक्रमही केला आहे. गोलंदाजीमध्ये विराट कोहलीने चार विकेट घेतल्या आहेत. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज -
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 8 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिखर धवन याच्या नावावर 6769 धावा आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 257 सामन्यात 6628 धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नर 6565 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. रैनाने 5528 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 5243 तर एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर 5162 धावा आहेत. ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमामकावर आहे.  गेल, उथप्पा आणि दिनेश कार्तिक अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. गेलच्या नावावर 4965, उथप्पाच्या नावावर 4952 आणि कार्तिकच्या नावावर 4831 धावा आहेत.