IPL 2025 RCB Retention List : साखळी फेरीत शानदार कमबॅक करत आरसीबीने आयपीएल 2024 प्लेऑपमध्ये धडक मारली.  सुरुवातीला आरसीबीने लागोपाठ सहा सामने गमावले होते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांनी लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत कमबॅक केले. सांघिक खेळाच्या जोरावर आरसीबीने प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. पण एलिमेनटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभवाचा धक्का दिला. आरसीबीचे 17 वर्षानंतरही जेतेपदाचं स्वप्न भंगले आहे. आता आरसीबीकडून पुढील हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. पण आयपीएल 2025 आधी मेगा लिलाव पार पडणार आहे. त्या लिलावाआधी प्रत्येक संघाला चार खेळाडू कायम ठेवण्याची संधी दिली जाणार आहे. पण त्याआधी आरसीबीच्या चाहत्यांना काही प्रश्न सतावत असतील. त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल याला आरसीबी रिटेन करणार का ? ग्लेन मॅक्सवेल आरसीबीचा कर्णधार राहणार का? कोणत्या खेळाडूंना आरसीबी रिटेन करणार ? याबाबत चाहत्यांमध्ये सस्पेन्स आहे. पण आरसीबी रिटेन करु शकणारे चार खेळाडूंबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.


विराट कोहली : 


रनमशीन विराट कोहली याला आरसीबी रिटेन करेल, यात कुणालाही शंका नसेल. कारण त्याचं प्रमुख कारण ब्रँड आणि विराट कोहलीची फलंदाजी हे असेल. विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीमुळेच आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेय. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 15 सामन्यात 155 च्या स्ट्राईक रेटसह 741 धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीने 38 षटकार ठोकले आहेत. सध्या ऑरेंज कॅप विराट कोहलीच्याच डोक्यावर आहे. आरसीबीसाठी विराट कोहलीने आठ हजार धावांचा पल्ला पार केलाय.


विल जॅक्स :


25 वर्षीय इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स याला आरसीबी रिटेन करु शकते. विल जॅक्स यानं यंदाच्या हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे. ग्लेन मॅक्सवेल फॉर्मात नसाताना जॅक्सने प्रभावी कामगिरी केली. विल जॅक्सने आठ सामन्यात 176 च्या स्ट्राईक रेटने 230 धावा केल्यात. त्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. जॅक्सला गोलंदाजीची तितकी संधी मिळाली नाही, पण आगामी हंगामात त्याला रिटेन केले जाऊ शकते. 


मोहम्मद सिराज : 


2018 पासून मोहम्मद सिराज आरसीबीचा सदस्य आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. सिराजला टीम इंडियाचं तिकिटही मिळालेय. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही, पण स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने भेदक मारा केला. सिराजने 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.मोहम्मद सिराज याला रिटेन केले जाण्याची शक्यता जास्त आहे. सिराजमुळे आरसीबीची गोलंदाजी अधिक मजबूत होते.


राजत पाटीदार :


विराट कोहलीनंतर आरसीबीमधील सर्वात शानदार फलंदाज म्हणून रजत पाटीदार नावा-रुपाला आलाय. पाटीदार हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो. खासकरुन तो फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतो. पाटीदारने यंदाच्या हंगामात 395 धावांचा पाऊस पाडलाय. पाटीदारमुळे आरसीबीचा मध्यक्रम मजबूत वाटतोय. त्यामुळे त्याला रिटेन केले जाण्याची दाट शक्यता आहे. 



फाफ डू प्लेसिस, यश दयाल, कॅमरुन ग्रीन यांनी यंदाच्या हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे रिटेनशन करणाऱ्यांची संख्या आयपीएलने वाढवली, तर या दोघांना रिटेन केले जाईल. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल याचाही विचार करण्यात येईल.