Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore : आयपीएल 2022 चा एलिमिनेटर सामना आज रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात कोलकात्यामध्ये होणार आहे. पण कोलाकात्यामध्ये पाऊस आल्यामुळे सामन्याला उशीर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. एलिमिनेटर सामना लखनौ आणि आरसीबीसाठी महत्वाचा असणार आहे. कारण पराभूत होणारा संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायरमध्ये राजस्थानसोबत भिडणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे... विराट कोहलीने आज 50 पेक्षा जास्त धावा करताच हा आगळावेगळा विक्रम विराटच्या नावावर होणार आहे. 


आयपीएलच्या इतिहासात असे घडलेच नाही - 
विराट कोहलीने जर आज 50 पेक्षा जास्त धावा काढल्या तर एका संघाकडून 50 पेक्षा जास्त धावा 50 वेळा करणारा एकमेव फलंदाज होणार आहे. आयपीएलच्या 15 वर्षामध्ये हा कारनामा कुणालाही जमलेला नाही. पण विराट कोहलीला हा मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये  44 अर्धशतक आणि पाच शतके लगावली आहेत. 


विराट इज बॅक -
आयपीएल 2022 मधील आरसीबीच्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहलीने 73 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने 14 सामन्यात 309 धावा केल्या आहेत. यादरम्यान दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. पण अखेरच्या सामन्यात अर्धशतक झळकावत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिलाय. 


लखनौ-आरसीबीमध्ये लढत - 
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे. 'करो या मरो'च्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. पराभूत संघआचे आव्हान संपुष्टात येणार आहे.. तर विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानसोबत भिडणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कोलकात्यामुळे दोन दिवसांपासून पाऊस पडत होता.. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे... नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.