Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2025 : एक काळ असा होता जेव्हा फिरकी गोलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) शांत ठेवत असायचे. पण गेल्या वर्षीपासून त्याने फिरकीविरुद्धच्या खेळात खूप सुधारणा केली आहे. याची झलक आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यातही दिसून आली, जेव्हा कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आणि सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती सारख्या फिरकी गोलंदाजांना चांगले धू धू धुतले. कोहलीने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 36 चेंडूत 59 धावा केल्या होत्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. कोहली गेल्या हंगामात ज्या लयीत होता त्याच लयीत दिसला.
आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी सामना करणार आहे. चेपॉक मैदान हे चेन्नई सुपर किंग्जचा गड राहिला आहे, या सामन्यातही सर्वांच्या नजरा कोहलीवर असतील. परंतु या स्टार फलंदाजाला रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि नूर अहमद सारख्या सीएसकेच्या फिरकी त्रिकुटाकडून कठीण आव्हान मिळेल, ज्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता.
चेपॉक स्टेडियमवर कोहलीचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. आरसीबीकडून खेळताना त्याने या स्टेडियमवर 14 सामन्यांमध्ये 28.14 च्या सरासरीने आणि 108.24 च्या स्ट्राईक रेटने 394 धावा केल्या. सीएसकेच्या फिरकी गोलंदाजांना तोंड देण्यासाठी कोहलीही घाम गाळत आहे. यावेळी विराट कोहली नेटमध्ये तीन वेगवेगळ्या बॅट घेऊन सराव करताना दिसला ज्याचा व्हिडिओ होत आहे.
चेपॉकमध्ये विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहलीने चेपॉकमध्ये दोनदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याला आता सीएसकेच्या फिरकीपटूंविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. गेल्या हंगामाच्या सुरुवातीला कोहलीला संघर्ष करावा लागला होता आणि तो फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजी करू शकला नाही. पण, त्याने हंगामाच्या उत्तरार्धात त्याच्या कमकुवत मुद्द्यांवर काम केले आणि फिरकीपटूंविरुद्ध धावा केल्या. कोहलीने 2024 च्या हंगामातील पहिल्या सहा डावांमध्ये 141.77 च्या स्ट्राईक रेटने 319 धावा केल्या ज्यामध्ये 29 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात कोहलीने पुढील नऊ डावांमध्ये 166.14 च्या स्ट्राईक रेटने 422 धावा केल्या, ज्यात 33 चौकार आणि 26 षटकारांचा समावेश होता.
हे ही वाचा -