Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants IPL 2025 : गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 190 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, लखनौने 23 चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठले. या सामन्यात हैदराबादच्या पराभवाचे एक कारण म्हणजे त्यांच्या अव्वल फलंदाजांचे अपयश. 

चौथ्या क्रमांकावर आलेल्या नितीश कुमार रेड्डी याने सुरुवातीला सावध फलंदाजी केली, पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर जाताना नितीश कुमार रेड्डीचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि असे काहीतरी केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लखनौचा गोलंदाज शार्दुल ठाकूरने तिसऱ्या षटकात सलग चेंडूंवर अभिषेक शर्मा (6) आणि इशान किशन (0) यांना आऊट केले. नितीशने ट्रॅव्हिस हेडसोबत मिळून डाव सांभाळला आणि तिसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. 47 धावा करून हेड बाद झाला. नितीशने सावध खेळत होता, पण 28 चेंडूत 32 धावा काढून रवी बिश्नोईने त्याला बोल्ड केले.

रागाच्या भरात डोक्यातील हेल्मेट काढले अन्... 

आऊट झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी शांततेत मैदानाबाहेर गेला, पण अचानक पायऱ्या चढण्यापूर्वी रागाच्या भरात डोक्यातील हेल्मेट काढले अन् पायऱ्यांवर फेकले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शार्दुल ठाकूर सामन्याचा ठरला 'हिरो'

सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 190 धावा केल्या होत्या. फलंदाजीच्या खेळपट्टीवर ही धावसंख्या कमी होती आणि याचे श्रेय शार्दुल ठाकूरला जाते, ज्याने इशान किशन आणि अभिषेक शर्मासह 4 विकेट घेतल्या. यासाठी त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.

191 धावांचा पाठलाग करताना निकोलस पूरनने 26 चेंडूत तुफानी खेळी खेळत 70 धावा केल्या, या डावात त्याने 6 षटकार आणि 6 चौकार मारले. मिचेल मार्शनेही 52 धावांची चांगली खेळी केली. लखनौने हा सामना 5 विकेट्सने जिंकला.

हे ही वाचा - 

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: एकीकडे धनश्रीसोबत घटस्फोट, दुसरीकडे नव्या मिस्ट्री गर्लसोबत युजवेंद्र चहल स्पॉट; आरजे महावश नाही, मग ही आहे तरी कोण?