१० डिसेंबर २०२२ रोजी ट्विटर वर खालील ट्विट येते. ट्विट करणाऱ्या माणसाचे नाव असते करुण नायर..

On 10 Dec 2022, Karun Nair tweeted, “Dear cricket, give me one more chance,"

ती संधी करुण नायर याला कालच्या सामन्यात इम्पॅक्ट सब म्हणून संधी मिळते..आणि खरोखर चा इम्पॅक्ट काय असतो हे दाखवणारी खेळी करून नायर खेळून गेला.. तो जेव्हा मैदानात येतो तेव्हा पहिल्या चेंडूवर फ्रेसर बाद झालेला असतो...आणि समोर आव्हान असते २०६ धावांचे...विचार करा करुण नायर याची अवस्था काय असेल....२०१८ नंतर त्याच्या बॅट मधून अर्धशतक येऊन आज ७ वर्ष झाली आहेत...आणि हा माणूस फॉर्म मध्ये असलेल्या राहुल च्या आधी मैदानात आला आहे. ...जर अपयश पदरी पडले तर टीकाकार त्यांची लेखणी आणि वाणी चालवायला तयार होतेच....संपूर्ण रणजी हंगामात धावांचा पाऊस पाडणाऱ्या, विजय हजारे ट्रॉफी मध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या ...आणि नंतर सय्यद मुस्ताक अली सामन्यात धावांचा पाऊस पाडणाऱ्या... करुण वर बी सी सी आय..ची करुणा होत नव्हती.. .पण करुण हार मानायला तयार नव्हता...त्याने काल सुद्धा हार मानली नाही...काल मैदानात येऊन तुम्ही तुमच्या बेसिक वर पक्के असाल तर  फॉरमॅट कुठला ही असु दे...धावा काढण्यास तुम्हाला कोणी ही रोखू शकत नाही..अगदी जगातील क्रमांक एक चां गोलंदाज जसप्रीत बुमरा देखील...

काल त्याने आपल्या खेळीची सुरुवात बोल्ट ला एक खणखणीत ड्राईव्ह मारून केली...तेव्हाच तो किती सुंदर फॉर्म मध्ये आहे हे दिसून आले..त्यानंतर पुढचा चेंडू कट करून बॅकवर्ड पॉईंट मधून सीमापार करतो...नंतर आलेल्या बुमरा ला एक इन साईड आउट करून एक्स्ट्रा कव्हर वरून चौकार वसूल करतो... त्यानंतर  चहर च्या गोलंदाजीवर देखील तो एक खणखणीत ड्राईव्ह मारून चौकार वसूल करतो... पावर प्ले चे शेवटचे षटक घेऊन येणाऱ्या बुमराच्या एका षटकात तो अठरा धावा वसूल करतो...त्याच्या एका चेंडूवर तो एक देखणा पिक अप शॉट मारून षटकार मारतो...आणि एका स्लोवर वन वर नयनरम्य लोफ्टेड ड्राईव्ह मारून षटकार मारतो...आणि त्याच षटकात २०१८ नंतर आय पी एल मधील आपले अर्धशतक पूर्ण करतो..ते सुद्धा केवळ २२ चेंडूत...अर्धशतक झाल्यावर देखील करुण  कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर स्वीप चे फटके खेळून चौकार आणि षटकार वसूल करतो..आजच्या त्याच्या संपूर्ण खेळीत तो कुठे सुद्धा हरलेला दिसला नाही.दिसला तो केवळ आत्मविश्वास..माझ्या मधे अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे असे संदेश देणारा करुण..आयपीएलमधे खेळण्यापूर्वी त्याने रणजी हंगामात खोऱ्याने धावा काढल्या होत्या...विजय हजारे मध्ये केवळ ९ सामन्यात आणि ८ डावात ७७९ धावा आणि त्या सुद्धा ३८९ च्या सरासरीने...तो इतका सुंदर खेळत होता की सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा त्याच्या भीम पराक्रमाची दखल घेऊन त्याचे कौतुक करणारे ट्विट केले होते...पण त्या नंतर सुद्धा चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात त्याची वर्णी लागली नाही...सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये धावा करून तो तिन्ही फॉरमॅट चा खेळाडू आहे हे त्याने निवड समितील लोकांना दाखवून दिले...त्याने कसोटीत त्रिशतक मारले...वीरेंद्र सेहवाग नंतर हा दुसराच खेळाडू..आणि तो कसोटी खेळला फक्त ६... करुण सध्या व्यवस्थे बरोबर लढत आहे.

येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे,पावलांना पसंत नाही..

या सुरेश भट यांच्या ओळी तो जगत आहे..आपल्या कठोर परिश्रमांच्या जीवावर तो भारतीय संघात निवड होण्यासाठी धडपड करीत आहे..त्याची ही धडपड आगामी इंगल्ड दौऱ्यात संपेल ही आशा आहे...कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मानहानीकारक पराभवानंतर एक जागा तर त्याच्यासाठी नक्कीच बनते..

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांचीआयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांचीअसे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

या गुरु ठाकूर यांच्या कवितेतून एक प्रकारे..त्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्याने कालच्या खेळीतून बीसीसीआयला उत्तर दिले आहे...करुण  ला त्यांच्याकडून कोणती ही करुणा नको आहे ..त्याला हवा आहे तो त्याचा हक्क...

संबंधित बातमी:

DC Vs MI IPL 2025: दिल्ली धावचीत