Virat Kohli Anger On Khaleel Ahmed : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 ची सुरुवात सलग 2 विजयांसह केली आहे. 28 मार्च रोजी सीएसके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने 50 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. तो मोठी खेळीही खेळू शकला नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सामन्यानंतरचा आहे, ज्यामध्ये विराट एका सीएसके खेळाडू खलील अहमदवर (Khaleel Ahmed) रागावताना दिसत आहे.

कोहलीशी पंगा अन् चेन्नईमध्ये दंगा! 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज खलील अहमद विराट कोहलीसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सामन्यानंतर विराट कोहली रवींद्र जडेजासोबत उभा आहे आणि कायतरी बोलत आहे. मग खलील अहमद त्याच्याकडे येतो. पण खलीलला पाहताच विराट कोहली रागाने काहीतरी बोलताना दिसला. दरम्यान, खलील अहमद शांतपणे ऐकत आहे. मी तुम्हाला सांगतो की, सामन्यादरम्यानही या दोन्ही खेळाडूंमध्ये गरमागरमी पाहायला मिळाली.

खरं तर, सामन्यात, विराट कोहलीला खलील अहमदच्या गोलंदाजीसमोर थोडा संघर्ष करताना दिसला आणि पहिल्याच चेंडूवर तो वाचला. त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर खलील अहमदने बाउन्सर टाकला, जो कोहलीने मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटपर्यंत पोहोचला नाही. यानंतर, फॉलोथ्रू दरम्यान खलील कोहलीच्या खूप जवळ आला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. यानंतर विराटनेही खलीलकडे रागाने पाहिले. त्यामुळे विराट सामन्यानंतर या घटनेबद्दल खलीलला फटकारत होता. 

विराट कोहलीने केल्या फक्त 31 धावा 

विराट कोहलीसाठी हा सामना काही खास नव्हता. तो 30 चेंडूंचा सामना करत फक्त 31 धावा करू शकला. यादरम्यान, त्याने 103.33 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि 2 चौकार आणि 1 षटकार मारला. पण, हंगामातील पहिल्या सामन्यात विराटने शानदार खेळी केली आणि केकेआरविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजयाकडे नेले.

हे ही वाचा -

आसिम रियाज आणि रजत दलालमध्ये हाणामारी, शिखर धवन भांडण सोडवायला आला अन्...पुढे काय घडलं?