Umram Malik Joined Sunrisers Hyderabad: ने कोरोना पॉझिटिव्ह असलेल्याटी. नटराजनच्या जागी जम्मू कश्मीरचा वेगवान गोंलदाज उमरान मलिकला शॉर्ट टर्म रिप्लेसमेंट करत संघात सामिल केले आहे. आयपीएलच्या नियमानुसार संघाला आपत्कालीन परिस्थितीत एका खेळाडूचा संघात समावेश करण्याची परवानगी दिली आहे. जो पर्यंत पूर्वीचा खेळाडू सामना खेळत नाही तोपर्यंत रिप्लेसमेंट केलेल्या खेळाडूला सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नटराजन पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत उमरान मलिकचं त्याच्या जागेवर खेळणार आहे. नटराजन जेव्हा कोरोनातून बरा झाल्यानंतर तो पुन्हा टीममध्ये येईल. तोपर्यंत उमरान मलिकचं सामने खेळेल. नटराजन दिल्ली कॅपिटल्सच्या विरूद्ध सामन्यातील पहिल्या रुटीन टेस्टमध्येच कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
कोण आहे उमरान मलिक?
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 1999 साली जन्म झालेल्या उमरान मलिकने जानेवारी 2021 मधील क्रिकेट संघात डेब्यू केला होता. उमरानने जम्मू-काश्मीरसाठी आतापर्यंत एक टी 20 आणि एक लिस्ट अ मॅच खेळली आहे. 21 वर्षाचाहा सुपरफास्ट गोलंदाज पूर्वीपासूनच नेट गोलंदाजीमध्ये हैदराबाद टीमचा भाग होता. त्याने जम्मू-कश्मीरसाठी टी 20 सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या.