IPL 2023 Umesh Yadav Bowling : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पंजाब किंग्सने (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knite Riders) सात धावांनी पराभव केला. हा दोन्ही संघांची आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिलात सामना होता. पंजाबनं (PBKS) विजयासह यंदाच्या मोसमाची सुरुवात. सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, पंजाबचा सात धावांनी विजय झाला. या सामन्यात कोलकाताची (KKR) सुरुवात खराब झाली. पंजाबच्या अर्शदीपने भेदक गोलंदाजी करत तीन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. याउलट कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज उमेश यादव याला एकच विकेट घेता आली. असं असलं तरी, त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
उमेश यादवने नावावर केला नवा विक्रम
पंजाब किंग्स विरोधात गोलंदाजी करताना उमेश यादवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League 2023) इतिहास रचला आहे. उमेश यादवने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चार षटकात 27 धावा देऊन एक गडी बाद केला. यासह उमेश यादव आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध उमेशने एकूण 34 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2013 मध्ये पंजाबविरुद्ध पहिला सामना खेळला होता. नव्या विक्रमासह सर्वाधिक विकेट घेत उमेशने ड्वेन ब्राव्होला मागे टाकलं आहे. ब्राव्होने मुंबई इंडियन्सविरुद्ध 33 विकेट घेतल्या होत्या.
2010 पासून खेळतोय आयपीएल
उमेश यादव 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 134 सामन्यांत 136 विकेट घेतल्या आहेत. उमेश फॉर्ममध्ये असल्यास कोणत्याही आक्रमक फलंदाजीला फाटा देऊ शकतो. तो डावाच्या सुरुवातीला शानदार गोलंदाजी करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या.
पंजाबविरुद्ध कोलकाताची खराब सुरुवात
पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. कोलकाताने अवघ्या 29 धावांत तीन विकेट गमावल्या. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य दिले होते. पंजाबच्या तगड्या गोलंदाजीमुळे कोलकाता खराब सुरुवात झाली. कोलकाताची धावसंख्या सात विकेट्सवर 146 अशी असताना पावसाला सुरुवात झाली खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबचा सात धावांनी विजय झाला. अर्शदीपने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :