DC vs MI : वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात मुंबईने दिल्लाचा पाच विकेटने पराभव केला.  160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने पाच गडी आणि पाच चेंडू राखून यशस्वीपणे केला.   जसप्रीत बुमराह आणि टीम डेविड मुंबईच्या विजयाचे हिरो राहिले. बुमराहने गोलंदाजीत कमाल केली तर टीम डेविडने फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. निर्णायक सामन्यात पराभव झाल्यामुळे दिल्लीचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले. मुंबईच्या विजयामुळे आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. मोक्याच्या सामन्यात पंतने केलेल्या चुकांमुळे दिल्लीचे प्लेऑफमधील आव्हान संपलं आहे..


पंतची चूक, दिल्ली आयपीएलमधून बाहेर -
मुंबईकडून दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. पण शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली मुंबईपेक्षा वरचढ होती. पण कर्णधार ऋषभ पंतच्या दोन चुकींमुळे दिल्लीच्या स्वप्न भंगलं आहे.  कर्णधार ऋषभ पंतने टीम डेविडचा रिव्यू घेतला नाही आणि  डेवाल्ड ब्रेविसचा सोपा झेल सोडला.. पंतच्या या दोन चुकांमुळेच दिल्ली प्लेऑफमधून बाहेर गेली आहे. 
 
फलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्याच चेंडू डेविडच्या बॅटची कड घेऊन गेला.. शार्दुल ठाकूरने बादची दाद मागितली.. पण पंचांनी नाबाद दिले.. त्यानंतर पंत DRS घेणार असे वाटत होते..त्याने चर्चाही केली.. पण डीआरएस घेतला नाही... रिप्लेमध्ये टीम डेविड बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. दिल्लीकडे दोन डीआरएस होते.. पंतने डीआरएस घेतला असता तर सामन्याचा निकाल कदाचीत बदलला असता..  टिम डेविडने जिवनदान मिळाल्यानंतर 11 चेंडूत 34 धावांचा पाऊस पाडला.  


ब्रेविसचा झेल सोडला अन् मॅच सोडली - 
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने ब्रेविसचा सोपा झेल सोडत सामनाही सोडला... ब्रेविस ताबोडतोड फलंदाजी करत होता.. त्यावेळी कुलदीपच्या चेंडूवर ब्रेविसचा झेल उडाला.. पण पंतला हा झेल घेता आला नाही.. अगदी सोपा झेल सोडला.. त्यामुळेच दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागाला. ब्रेविसने 37 धावांची खेळी केली. यात तीन षठकार आणि एका चौकाराचा सामावेश आहे.