IPL 2022 Playoffs : आयपीएलच्या मैदानात आज गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये चुरशीची लढाई होणार आहे. लखनौ आणि गुजरात अव्वल स्थानासाठी एकमेकांसमोर आमने सामने असतील. पुण्याच्या एमसीए मैदानावर लखनौ आणि गुजरात यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी लढत होणार आहे. यामधील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे... म्हणजे, प्लेऑफमधील चार संघापैकी एक संघ आज ठरणार आहे..


आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरात आणि लखनौ या दोन नव्या संघाचा समावेश करण्यात आला होता. आयपीएल स्पर्धा उत्तरार्धाकडे झुकली आहे, गुणतालिकेत याच दोन्ही संघाने बाजी मारली आहे. सध्या राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर आहे.. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाने 11 सामन्यात प्रत्येकी आठ सामने जिंकले आहेत. लखनौचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते अव्वल स्थानावर आहेत. तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आज जिंकणारा संघ पहिल्या स्थानावर पोहचेलच.. त्याशिवाय प्लेऑफमधील आपलं स्थानही पक्के करणार आहे. 


गुजरातची कामगिरी -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने आपल्या पहिल्याच हंगामात दमदार कामगिरी केली. गुजरातने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. या आठ विजयाचे आठ शिल्पकार आहे, हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही.. हीच गुजरातची प्रमुख ताकद आहे.. 


लखनौचे नवाब - 
लखनौ सुपर जायंट्सची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर आहे. लखनौनेही गुजरातप्रमाणे पहिल्याच हंगामात चमकादर कामगिरी केली आहे. अष्टपैलूंचा भरणा.. ही या संघाची प्रमुख ताकद आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत हा संघ संतुलित दिसतोय..  


कोणता संघ कुठे - 
लखनौ आणि गुजरात संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबी 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे... आरसीबीचा नेटरनरेट चांगला नसल्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आणि आरसीबी.. हे चार संघ प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत... दिल्ली, हैदराबाद यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहेत.त्याशिवा कोलकाता, पंजाब आणि चेन्नई यांचे आव्हान अद्याप जिवंत आहे... त्यामुळे प्लेऑफची लढाई अधिक रंजक झाली आहे.