Most Paid Players In IPL History : आयपीएल इतिहासातील (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आहे. या संघाचा कर्णधार असणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) 2011 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. यापूर्वी रोहित डेक्कन चार्जर्सचा भाग होता. दरम्यान सर्वात यशस्वी संघाचा कॅप्टन असणारा रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत रोहित शर्माने आयपीएलमधील दुसरा यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मागे टाकलं आहे. रोहित शर्माच्या आयपीएलमधील कमाईचा विचार केल्यास त्याने आतापर्यंत आयपीएलमधून जवळपास 178.6 कोटी रुपये कमावले आहेत.


रोहितने धोनीला टाकलं मागे


आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एकूण 178.6 कोटींची कमाई केली आहे. तर महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात 176.84 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय या यादीत विराट कोहली आणि सुरेश रैना यांचीही नावे आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 173.2 कोटींची कमाई केली आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने 14 वर्षात लीगमधून 110.7 कोटी रुपये कमावले आहेत.


रोहित शर्माचा आयपीएलमधील प्रवास  


2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सने रोहित शर्माला 3 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यानंतर रोहित शर्माला पुढील दोन सीझनसाठी 3-3 कोटी रुपये पगार म्हणून मिळाले, पण 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 2014 मध्ये 12.5 कोटींमध्ये रिटेन केले होते. त्यानंतर पुन्हा मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 2018 मध्ये 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले. आता पुन्हा एकदा आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले.


IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ


रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, डिवाल्ड ब्रेव्हिस, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंह, जोफ्रा आर्चर, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, कॅमेरून ग्रीन, रिचर्डसन, पियुष चावला, डुआन जॅन्सन, शम्स मुलाणी, नेहल वढेरा, विष्णू विनोद, राघव गोयल


हे देखील वाचा-



  • Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, 17.50 कोटींना विकत घेतलेला खेळाडू दुखापतग्रस्त, शस्त्रक्रिया होणार