चंदीगड : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) काल झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma), तिलक वर्माच्या फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर 192 धावांची खेळी कोली. सूर्यकुमार यादवनं 53 बॉलमध्ये 78 धावांची खेळी करत मुंबईचा डाव सावरला. रोहित शर्मानं देखील 36 धावा केल्या. याशिवाय तिलक वर्मानं 18 बॉलमध्ये 34 धावा केल्या. मुंबईचा सलामीवीर ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानं 81 धावांची भागिदारी केली. सर्यकुमार यादवचे अम्पायरच्या दोन निर्णयांना चॅलेंज करण्याचा निर्णय गेमचेंजर ठरला.
सूर्यकुमार यादवमुळं रोहित शर्माला जीवदान
रोहित शर्माला हर्षल पटेलच्या बॉलिंगवर अम्पायरनं एलबीडब्ल्यूचं अपील मान्य करत आऊट दिलं होतं. या निर्णयानंतर रोहित शर्मा डीआरएस घ्यायचा की नाही अशा द्विधा मनस्थितीत होता. सूर्यकुमार यादवनं रोहित शर्माला डीआरएस घ्यायला सांगितलं. रोहित शर्मानं डीआरएस घेतल्यानंतर बॉल ट्रॅकिंग सिस्टीममध्ये स्टम्प मिस होत असल्याचं स्पष्ट झालं आणि मैदानावरील अम्पायरला निर्णय बदलावा लागला.
सूर्यकुमार यादवला कगिसो रबाडाच्या बॉलिंगवर अम्पायरनं एलबीडब्ल्यू आऊट दिलं होतं. यावेळी देखील सूर्ययुकमार यादवनं डीआरएस घेतला आणि त्यानंतर बॉल ट्रॅकिंगमध्ये स्टम्प मिसिंग असल्यानं अम्पायरला निर्णय बदलावा लागला. सूर्युकमार यादवनं त्याच ओव्हरमध्ये नंतर चौकार षटकार मारले.
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी
सूर्यकुमार यादव आयपीएलमधील पहिल्या तीन मॅचमध्ये दुखापतीमुळं खेळू शकला नव्हता. सूर्युकमार यादव फिट झाल्यानंतर पहिली मॅच दिल्लीविरुद्ध खेळला होता. त्यामध्ये मुंबईनं विजय मिळवला होता. मात्र, सूर्यकुमार यादव त्या मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला होता. यानंतर सूर्यकुमार यादवनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये 53 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव पुन्हा शुन्यावर बाद झाला. यानंतर पंजाब किंग्ज विरुद्ध सूर्यकुमार यादवनं 78 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं 53 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरच्या जोरावर 78 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या खेळीचं कॅप्टन हार्दकि पांड्या आणि मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी देखील कौतुक केलं.
मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत झेप
मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवला तर चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि पंजाब किंग्जला पराभूत करत सहा गुण मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सनं नवव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईची पुढील लढत राजस्थान रॉयल्स विरुद्ध जयपूर येथे होणार आहे.
संबंधित बातम्या :