Suresh Raina in IPL : इंडियन प्रिमीयर लीगमधील एक सर्वात मनोरंजनात्मक खेळाडू असलेल्या सुरेश रैनाला यंदा कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. रैनाला चेन्नई सुपरकिंग्ज संघाने विकत घेण्यात रस न दाखवल्याने रैना यंदा आयपीएलच्या मैदानात दिसणार नाही. पण रैनावर एक नवी जबाबदारी पडली असून तो आता कॉमेन्ट्री करण्यासाठी स्टेडीयमध्ये नक्कीच असेल. त्यामुळे सुरेश रैना यंदा बॅटच्या जागी हातात माईक घेऊन कॉमेन्ट्री करताना दिसेल.


रैना IPL 2022 मध्ये स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेन्ट्री करणार आहे. डिजनी+हॉटस्टारच्या संजोग गुप्ता यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'सुरेश रैना यंदा IPL खेळणार नाही. पण त्याला कोणत्या न कोणत्या रुपात स्पर्धेशी जोडण्याकरता आम्ही हे करत आहोत. त्याला मिस्टर आयपीएल म्हटलं जातं त्यामुळे आता तो आयपीएलची हिंदीमध्ये कॉमेन्ट्री करणार आहे. रवी शास्त्री हे देखील यंदा कॉमेन्ट्री करतील अशी शक्यता असल्याने रैना आणि शास्त्री मिळून कॉमेन्ट्री करण्याची शक्यता आहे.


आणि सुरेश रैना राहिला अनसोल्ड


सुरेश रैनाने IPL मध्ये सर्वात आधी 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. पण मागील आयपीएलमध्ये कमी सामन्यात संधी मिळालेल्या रैनाला खास खेळ दाखवता आला नाही. त्याआधीच्या आयपीएलमध्येही कोरोनाच्या संकटामुळे तो युएईत गेला नव्हता. ज्यानंतर यंदा त्याला संघाने रिटेन केलं नाही. पण लिलावात त्याला पुन्हा संघात घेतील अशी आशा साऱ्यांनाच होती. पहिल्या दिवशी कोणीही विकत न घेतल्याने दुसऱ्या दिवशीतरी अखेर चेन्नईचा संघ रैनाला विकत घेईल असे वाटत होते. पण 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्येही त्याला कोणीही विकत घेतले नाही. त्यामुळे एक काळ गाजवलेला रैना आता आयपीएल गाजवताना दिसणार नाही.


हे ही वाचा-


IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11


गुजरातच्या संघासाठी खूशखबर! हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट केली पास


TATA IPL 2022: तब्बल 8 संघाकडून खेळला 'हा' खेळाडू, मेगा ऑक्शनमध्ये ठरला अनसोल्ड; अखेर कोलकात्यानं घेतलं विकत, चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha