Hardik Pandya : गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट पास केली आहे. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बुधवारी हार्दिक पांड्याने यो यो चाचणी पास केली आहे. यो यो टेस्ट पास केल्यामुळे हार्दिक पांड्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. 


बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले की, ‘दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी फिटनेस चाचणी महत्वाची आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी खेळाडूंची फिटनेस चाचणी करणे अनिवार्य आहे. भविष्यात हे खेळाडू भारतीय संघाचा भाग असतील. त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.’ दरम्यान, दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यो यो चाचणी अपयशी ठरला आहे. यो यो चाचणीचा सध्याचा मर्यादा 16.5 इतका आहे, पृथ्वीचा स्कोर फक्त 15 होता.  दरम्यान, टी20 विश्वचषकानंततर हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर होता. आता यो यो टेस्ट पास झाल्यानंतर हार्दिकचा भारतीय संघात खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. 28 मार्च रोजी हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा संघ लखनऊ सुपर जायंट्सविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे 


26 मार्च रोजी शुभारंभ – 
26 मार्च 2022 पासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहेय चेन्नई आणि कोलकाता यांच्यात पहिला सामना होणार आहे. गुजरात संघाचा पहिला सामना 28 मार्च रोजी होणार आहे. 


असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये