SRH Jersey IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी प्रत्येक संघाने आपली तयारी सुरु केली आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) संघाने आपली जर्सीचं अनावरण केलेय. हैदराबाद संघाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये जर्सी लाँच केल्याचं सांगण्यात आले आहे. 


हैदराबाद संघाने ट्वीट केलेल्या व्हिडीओत  मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्याशइवाय उमरान मलिक (Umran Malik) आणि वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) हे नव्या जर्सीमध्ये दिसत आहेत. ऑरेंज आर्मीची ही जर्सी अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'आयपीएल 2023 साठी आमची ऑरेंज आर्मी...'


हैदराबाद संघाने ट्वीट करत नव्या जर्सीची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये हैदराबाद संघाने म्हटलेय की, आयपीएल 2023 साठी आमची ऑरेंज आर्मी सज्ज झाली आहे.  हैदराबाद संघाने ट्वीट केलेल्या व्हिडीओत मयंक अग्रवाल याच्याशिवाय वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर दिसत आहेत. हैदराबाद संघाच्या चाहत्यांना ही नवी जर्सी पसंतीस पडली आहे. सोशल मीडियावर हैदराबादच्या या ऑरेंज जर्सीची चर्चा आहे. हैदराबादने ट्वीट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 





एडन मारक्रम हैदराबादचा कर्णधार -


2023 च्या हंगामासाठी दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. मारक्रमने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स फ्रेंचायजीने जेतेपद पटकावलं होतं.  हैदराबादच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत मारक्रमशिवाय भुवनेश्वर कुमार आणि मयांक अग्रवाल यांची नावे चर्चेत होती. दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू अल्पवधीतच भारतात प्रसिद्ध झाला आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व केल्यामुळे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. तसेच तो विश्वचषक जिंकणारा एकमेव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. मार्करम याने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंडर 19 विश्वचषक जिंकून दिला होता.  


आयपीएल 2023 मध्ये 74 सामने


आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहेत. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंघणार आहे. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होणार आहेत. 


IPL 2023 Groups:


दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.