Pahalgam Terror Attack हैदराबाद: काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आतापर्यंत एकूण 26 जणांना प्राण गमावले लागले आहे. पहलगामच्या बैसरनमध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचे देशासह जगभरात तीव्र पडसाद उमटत असताना त्याचा परिणाम आता आयपीएल (IPL) सामन्यांवर देखील होतांना दिसत आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) खेळाडू आयपीएल सामन्यादरम्यान काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Continues below advertisement

सनरायझर्स (SRH) हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या (MI) आजच्या (23 एप्रिल) सामन्यात कोणतेही चीअर लीडर्स नसणार आहे. तसेच आतषबाजी देखील केली जाणार नसल्याचे पुढे आले आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत बाधित झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघ एक मिनिटाचे मौन देखील पाळतील. अशी ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या घटनेचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

ना फटाके, ना चीअर लीडर्स... मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCCI)एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून खेळतील आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळतील. पुढे ते  बोलताना ते म्हणाले की, मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान कोणतेही चीअरलीडर्स नसतील. कोणतेही फटाके फोडले जाणार नाहीत. देशभरातली विराट कोहलीसह अनेक महान क्रिकेटपटूंनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचेच पडसाद आता आजच्या सामन्यात देखील बघायला मिळणार आहे. 

Continues below advertisement

दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

पहलगामच्या बैसरनमध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा हात असल्याचे मानले जात आहे. दक्षिण काश्मीरमधील या लोकप्रिय पर्यटन स्थळावर मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी गटाचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडले आणि अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देशाचा दौरा करण्यास नकार दिला. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दुबईमध्ये तटस्थ स्थळ देण्याची तरतूद करावी लागली होती.

इतर महत्वाच्या बातम्या