CSK vs SRH Possible Playing11 : आयपीएलमध्ये सनराजयर्स हैदराबादसमोर धोनीच्या चेन्नई संघाचे आव्हान आहे. दन्ही संघामध्ये आज काटें की टक्कर होण्याची शक्यता आहे. चेन्नईतील 'एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक' मध्ये लढत रंगणार आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत देणारी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा दिसू शकतो. त्यामुळे दोन्ही संघाच्या प्लेईंग ११ मध्येही बदल दिसण्याची शक्यता आहे. 


चेन्नईच्या संघात न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल सँटनर याला संधी दिली जाऊ शकते. तर हैदराबादचा संघ आदिल रशिद याच्यासोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बेन स्टोक्स पूर्णपणे फिट असून तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जातेय. धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मागील सामन्यात धोनीच्या दुखापतीने डोके वर काढले होते. त्यातच डेवेन कॉनवे विकेटकिपिंगचा सराव करताना फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे धोनी आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच वर्तवण्यात येत आहे. धोनी नसेल तर संघाची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न चाहत्यांसमोर उभा आहे. पण धोनीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दोन्ही संघाच्या प्लेईंग ११ मध्ये फिरकी गोलंदाजांना स्थान मिळू शकते. पाहूयात आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभावित प्लेईंग ११ कशी असेल.. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कुणाचा वापर करु शकतात. 


चेन्नई आणि हैदराबाद संघी संभावित प्लेईंग ११ कशी असेल.. कुणाला संधी मिळणार ? 


CSK प्लेइंग-11 (प्रथम फलंदाजी आली तर ) : डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), तुषार देशपांड, महिष तीक्ष्णा, मिचेल सँटनर.


CSK प्लेइंग-11 (प्रथम गलंदाजी असेल तर ): डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), आकाश सिंह, तुषार देशपांडे, महीष तीक्ष्णा, मिचेल सँटनर


CSK इम्पॅक्ट प्लेयर्स: आकाश सिंह/अंबाती रायडू.


SRH प्लेईंग-11 (प्रथम फलंदाजी असेल तर): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, वाशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, आदिल रशिद, मयंक मार्कंडे. 


SRH प्लेईंग-11 (प्रथम गोलंदाजी असेल तर): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, वाशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, आदिल रशिद, मयंक मार्कंडे, टी नटराजन.


SRH इम्पॅक्ट प्लेयर्स : टी नटराजन/अब्दुल समद.