IPL 2023 Points Table : गुरुवारी आयपीएलमध्ये दोन सामन्याची मेजवानी झाली. दुपारी आरसीबीने पंजाबचा फडशा पाडला तर सायंकाळी दिल्लीने रडतखडत कोलकात्यावर विजय मिळवला. सलग पाच पराबानंतर दिल्लीने पहिला विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. कोलाकत्याचा पराभव करत दिल्लीने दोन गुण मिळवले आहेत. दिल्ली अद्याप गुणतालिकेत तळाशीच आहे. दिल्लीचे सहा सामन्यात पाच पराभव झाले आहेत. त्यामुळे ते तळाशाची आहेत. संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. 


राजस्तान-लखनौमध्ये पहिल्या स्थानासाठी झुंज, हैदराबाद-दिल्ली तळाशीच - 


संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ यांची गुणतालिकेत काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाचे समान गुण आहेत. फक्त सरस नेट रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पहिल्या स्थानावर आहे.  राजस्थानने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. लखनौने सहा सामन्यात चारच विजय मिळवले आहेत. चेन्नई, गुजरात, आरसीबी, मुंबई आणि पंजाब या सर्व संघाने प्रत्येकी तीन तीन सामने जिंकत सहा गुणांची कमाई केली आहे. पण सरस नेट रनरेटच्या आधारावर चेन्नई तिसऱ्या तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे. आरसीबी पाचव्या तर मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबचा संघ सातव्या स्थानावर विराजमान आह. कोलकाता आठव्या आणि हैदराबाद दहाव्या स्थानावर आहे. 


ऑऱेंज कॅप फाफच्या डोक्यावर -


आरसीबीचा विस्फोटक सलामी फलंदाज फाफ डु प्लेसिस याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. त्याने सहा सामन्यात चार अर्धशतकासह 343 धावांचा पाऊस पाडलाय. दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने सहा डावात चार अर्धशतके झळकावत २८५ धावा चोपल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२० इतका राहिलाय. तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा  विराट कोहली आहे.. त्याने सहा डावात चार अर्धशतकासह २७९ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर जोस बटलर आहे.. बटलरने सहा डावात २४४ धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर वेंकटेश अय्यर आहे. त्याने २३४ धावा केल्या आहेत. ३०० धावांचा पल्ला पार कररणारा फाफ एकमेव फलंदाज आहे. 


पर्पल कॅप सिराजच्या डोक्यावर -


गेल्या वर्षभरापासून सिराज भेदक मारा करतोय. आयपीएलमध्येही सिराजची कामगिरी दमदार झालेली दिसत आहे. सिराज याने सहा सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क वूड आहे. त्याने 11 विकेट घेतल्या आहेत. चहल आणि राशिद खान यांनीही प्रत्येकी 11 विकेट घेतल्या आहेत. शामीने 110 विकेट घेतल्या आहेत.