Player of the match GT vs SRH : क्रिकेटच्या सामने म्हटलंकी त्यात काही अशाही गोष्टी घडतात ज्या साऱ्यांनाच चकीत करु सोडतात. बुधवारच्या गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यातही असंच काही झालं. शक्यतो सामन्यानंतर जिंकणाऱ्या संघातील खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ज्यालाच आयपीएलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच असंही म्हटलं जातं, ते अवार्ड दिलं जातं. पण बुधवारच्या सामन्यात मात्र साऱ्यांनाच आश्चर्यचकीत करणारी गोष्ट घडली. सामना पराभूत झाल्यानंतरही सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उम्रान मलिकला प्लेयर ऑफ द मॅच अवार्ड देण्याक आलं. सामन्यात त्याने अफलातून गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतले, ज्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 



उम्रानने सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने सर्व महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्याच गुजरातचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांचा समावेश आहे. कोणत्याही अनकॅप्ड गोलंदाजाचं आयपीएलमधील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी अंकित राजपूत यानेही केली होती. अंकित राजपूतने 2018 साली सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (SRH) 14 रन देत 5 विकेट्स घेतले होते. तर केकेआरच्या वरूण चक्रवर्तीने 2020 साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) 20 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय आरसीबीचा हर्षल पटेल आणि पंजाब किंग्सचा (PBKS) अर्शदीप सिंह यांनीही हा कारनामा केला आहे.


गुजरातचा 5 विकेट्सनी विजय


हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात सन्माजनक झाली. गिल आणि साहा यांनी 69 धावांची सलामी दिली. उमरान मलिक याने भेदक मारा करत गुजरातच्या अडचणी वाढवल्या. उमरान मलिकने चार षटकात पाच विकेट घेतल्या. उमरान मलिकशिवाय एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. गुजरातकडून साहाने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. त्याशिवाय राहुल तेवातियाने 40 तर राशिद खान याने 31 धावांची नाबाद खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला. गिल 22, हार्दिक पांड्या 10, डेविड मिलर 17 आणि अभिनव मनोहर 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.  


हे देखील वाचा-