MI vs PBKS, IPL 2022 : सलामी फलंदाज शिखर धवन याने आयपीएलच्या 15 व्या हंगमात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शिखर धवन याने मुंबईविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम नावावर केला आहे. याआधी हा विक्रम मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर होता. शिखर धवन याने बुधवारी झालेल्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. (Shikhar Dhawan has scored the most runs against Mumbai Indians in IPL history)
पुण्यातील एमसीए मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात शिखर धवन याने मुंबईविरोधात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 824 धावांसह सुरेश रैना मुंबईविरोधात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र, बुधवारच्या सामन्यात शिखर धवन याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबईविरोधात सर्वाधिक धावा कऱणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. रैनाच्या नावावर 824 धावा आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर 36 म्हणजेच एबी डिव्हिलिअर्सचा क्रमांक लागतो. डिव्हिलिअर्सच्या नावावर 785 धावा आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने मुंबईविरोधात 769 धावा चोपल्या आहेत. युनिवर्स बॉस ख्रिस गेल 708 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
पुण्याच्या एमसीए मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दणक्यात सुरुवात केली आहे. सलामी फलंदाज मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवात केली. शिखर आणि मयांक यांनी 9.3 षटकात 97 धावांची सलामी दिली. शिखर धवन 35 धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल अर्धशतकानंतर बाद झाला.
- Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण
- IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
- Sunil Gavaskar : 'आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहतोय', आयपीएल कॉमेन्ट्री दरम्यान गावस्करांचा टोला