IPL 2022 : इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL 2022) 22 व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरुला 23 धावांनी मात दिली. नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी घेतली खरी पण चेन्नईने 216 धावांचा डोंगर उभारल्याने आरसीबीला हे आव्हान गाठणे अवघड झाले. त्यात सर्वच पहिल्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले. अशात दिनेश कार्तिकने मात्र सामना पलटवण्याचा प्रयत्न केला खरा पण चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजाने त्याचा अफलातून झेल घेतला आणि त्यानंतर हटके सेलिब्रेशन देखील केलं.
आरसीबी 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर सुयश प्रभुदेसाईने शाहबाज अहमदसोबत मिळून 33 चेंडूत 60 धावांची भागिदारी रचली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर मात्र सर्व जबाबदारी अनुभवी दिनेश कार्तिकवर आली. दिनेशने देखील 14 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकत 34 धावा केल्या पण त्याच दरम्यान त्याने खेचलेल्या ब्राव्होच्या चेंडूवर त्याने ठोकलेल्या एका दमदार शॉटदरम्यान जाडेजाने सीमारेषेवर अप्रतिम असा झेल पकडला. ज्यानंतर त्याने अगदी मैदानावरच झोपत हटके सेलिब्रेशन केले, त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बंगळुरुचा 23 धावांनी पराभव
आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सलग चार सामने गमावल्यानंतर चेन्नईनं पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 193 धावापर्यंत मजल मारता आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mohammed Siraj Helicopter Shot : चेन्नईविरुद्ध अखेरच्या बॉलवर सिराजचा बेधडक हेलिकॉप्टर शॉट, नेटकरी म्हणतात हाच खरा 'LORD'
- IPL 2022 : 'कर्णधार म्हणून मिळवलेला पहिला विजय माझ्या पत्नीला समर्पित', चेन्नई सुपर किंग्सच्या हंगामातील पहिल्या विजयानंतर जाडेजा खुश!
- Suyash Prabhudessai : आरसीबीकडून सलामीच्या सामन्यात छाप सोडणारा सुयश प्रभुदेसाई आहे तरी कोण?